केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मोर्चा

Congress agitation
Congress agitationesakal

नाशिक : पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी संसदेत केलेल्या काँग्रेसविरोधी (Congress) वक्तव्यावरून पक्षाच्या देशभरातील कार्यकर्त्यांत असंतोषाचे वातावरण आहे. याविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी रविवारी (ता. २०) दुपारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्या गंगापूर रोडवरील निवासस्थानी मोर्चाद्वारे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अशोक स्तंभ भागात अडविला. याठिकाणी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत देशातील कोरोना (Corona) उद्रेकाला काँग्रेससह महाराष्ट्र शासन जबाबदार असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे काँग्रेस पक्षात संतापाचे वातावरण आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या वक्तव्याविरोधात पक्षातर्फे लढा उभारण्याचा आदेश दिला. त्यानुसार शहर काँग्रेसतर्फे रविवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानी धडक देत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळपासून कमिटीत मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले. दुपारी साडेबाराला मोर्चाला सुरवात झाली.

Congress agitation
PM मोदींनी नाही, काँग्रेसनं देशाची माफी मागावी - फडणवीस

जोरदार घोषणाबाजी

महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस कमिटीत काँग्रेसचे नेते व पदाधिकारी दाखल झाल्यावर दुपारी बाराला केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीनंतर पदाधिकारी व कार्यकर्ते गंगापूर रोडकडे मार्गस्थ झाले. मात्र, पोलिसांनी अशोक स्तंभावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने आंदोलन डॉ. पवार यांच्या निवासस्थानी पोचू शकले नाही. आंदोलन स्तंभावर पोचण्यापूर्वीच पोलिसांनी दोर लावून हा रस्ता बंदिस्त केला होता.

पक्षाचे शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रीजकिशोर दत्त, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, मध्य ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, अण्णा मोरे, नगरसेवक राहुल दिवे, आशाताई तडवी, जॉय कांबळे, विजय राऊत, उद्धव पवार, सुचेता बच्छाव, ज्यूली डिसोझा, हनीफ बशीर, सिराज कोकणी, सुरेश मारू, अभिजित राऊत यांच्यासह विविध ब्लॉकचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Congress agitation
आंदोलन कोणाचं माहिती नाही, काँग्रेस रॅलीतील वारकऱ्यांचं भन्नाट उत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com