Nashik Accident News: कंटेनरची आयशरला धडक; मायलेकी ठार, 3 जखमी | Container collides with Eicher mother daughter killed 3 wounded Nashik Accident News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik Accident News: कंटेनरची आयशरला धडक; मायलेकी ठार, 3 जखमी

Nashik Accident News : आयशरमध्ये तांदळाचा भुसा घेऊन घोटी येथून जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मायलेकी ठार तर तिघे जखमी झाले.

आज सकाळी कन्नमवार पूल येथील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. अपघातात घोटी येथील तरनम अफजल शेख (वय ४) व नथिसा अफजल शेख (२६) या दोघा मायलेकींचा मृत्यू तर अफजल रोशनअली शेख, कु साबिना शेख (५) व जेनेद शेख (१) असे तिघे जखमी झाले. (Container collides with Eicher mother daughter killed 3 wounded Nashik Accident News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इगतपुरीतील घोटीत राहणारे अफजल शेख मंगळवारी (ता.२३) आयशर वाहनातून क्रमांक (एम एच ०४ एफ यू ०६७१) तांदळाचा भुसा घेऊन धुळ्याला जात होते. त्यांच्या समवेत पत्नी नथिसा, मुलगी तरनम व जुनेद असे पाच जण होते.

सकाळी कन्नमवार पूल उड्डाणपुलावर शेख यांनी चारचाकी थांबवली व पती, पत्नी गाडी खाली उतरून दोरी बांधत होते मुले वाहनात बसलेले होते. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या एका कंटेनर क्रमांक (एम एच ४३ बीपी १०३३) रस्त्यात उभ्या वाहनाला धडक दिली.

त्यात खाली असलेल्या नथिसा यांना चिरडले तर पती रस्त्यावर पडले. वाहनात बसलेली मुलगी तरनम खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर मार लागला तर सबीना व जुनेद हे जखमी झाले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या अपघातात कंटेनर चालक मोहम्मद ताहीर शेख (वडाळा) हा जखमी झाला आहे.

टॅग्स :NashikAccident Death News