नाशिक : पर्यावरणप्रेमींची अवमान याचिका; वृक्षतोडीला विरोध

मनपाचा पाय खोलात; वृक्षतोडीला विरोध वाढला
Contempt petition of environmentalists Deforestation
Contempt petition of environmentalists Deforestationsakal

नाशिक : मायक्रो सर्कल व त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षप्रेमींनी आता मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. महापालिकेसह राज्य शासन, वनविभागाला प्रतिवादी करण्यात आले आहे. नियम डावलून वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. याचिकेवर शुक्रवारी (ता. २८) ऑनलाइन सुनावणी होणार आहे.

Contempt petition of environmentalists Deforestation
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांनी मानले PM मोदींचे आभार

मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपूल बांधला जात आहे. सुमारे अडीचशे कोटी रुपये किमतीच्या या पुलावरून अनेक वाद-विवाद झाले. नागरिकांचा विरोध, वाहतूक सर्वेक्षण न करताच उड्डाणपूल तयार केला जात असल्याच्या आरोपाने वादाला सुरवात झाली. मायको सर्कल येथे उड्डाणपूल आवश्‍यक होता, परंतु त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाची आवश्‍यकता नसल्याने मंजूर करण्यात आल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. तर स्थानिक व्यावसायिकांनीदेखील रोष व्यक्त करत आंदोलनाची भूमिका घेतली. बरीच भवती अन्‌ भवती झाल्यानंतर श्रेयवाद सुरू झाला. भाजपच्या नेत्यांनी पुलाचे श्रेय घेतले. त्यानंतर सिमेंटच्या प्रतवारीवरून वाद झाला. तब्बल ४४ कोटी रुपये वाढविण्यात आल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली. उड्डाणपुलाच्या फेरबदलात स्टार रेटची अट टाकताना नव्याने मंजुरी दिल्याने पुलाच्या संरचनेचा प्रश्‍न निर्माण झाला.

Contempt petition of environmentalists Deforestation
लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारी संतापजनक; दिल्ली उच्च न्यायालयाची नाराजी

संरचना बदलली जात असेल तर नव्याने निविदा का काढली गेली नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला. विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवूनच प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी करत उच्च न्यायालयात आव्हान दिले. भाजप सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेता अरुण पवार, जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीदेखील पुलाच्या निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त करत प्रशासनाविरोधात दंड थोपटले. मुकेश शहाणे यांच्या याचिकेवर सुनावणी देताना जनहित याचिकेचे स्वरूप देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. आता वृक्षप्रेमी ह्णषिकेश नाझरे व मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी (ता.२८) दुपारी बारा वाजता ऑनलाइन सुनावणी होणार असल्याची नोटीस महापालिकेला बजावण्यात आली आहे.

ठाकरेंची भेट अन्‌ अवमान याचिका

उच्च न्यायालयाने वृक्षतोडीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे घालून दिले आहेत. त्यात कोणते वृक्ष तोडावे व कोणते तोडू नये, यासंदर्भात स्पष्ट सूचना आहे. परंतु, नाशिक महापालिकेने वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर करताना मनमानी केल्याचा दावा याचिकेत करताना न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, जुन्या वृक्षांसह ५८८ वृक्षतोडीवरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेरिटेज वृक्षाला भेट देणार आहे. शुक्रवारी (ता. २८) त्यांचा पर्यावरणप्रेमींच्या हस्ते सत्कार होणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलासह वृक्षतोडीच्या मुद्द्यावर शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com