Sakal Impact : ड्रेनेजलाइनच्या कामास सुरवात

Work in progress to repair broken drainage pipe.
Work in progress to repair broken drainage pipe.esakal

इंदिरानगर (जि. नाशिक) : पावसाळी गटार टाकण्याच्या कामात खड्डे खोदताना फुटलेल्या ड्रेनेजपाइप (Drainage) बाबत शुक्रवारी (ता. २४) ‘सकाळ’ मध्ये 'ड्रेनेजलाइन फुटल्याने नागरिक हैराण’ अशा

आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ही दुरुस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (contractor carried out repairs after news of content of Citizens worried due to burst drainage line was published by sakal newspaper nashik news)

खड्डे खोदताना फुटलेल्या ड्रेनेजपाइप आदींसह इतर सामग्री येथे टाकण्यात आली असून भूमीगत फुटलेल्या सिमेंटच्या ड्रेनेज पाइपचे नवीन सिमेंटचा पाइप टाकून चेंबर बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. गुरुवारी (ता. १६) खड्डे खोदत असताना हा पाइप फुटला होता. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मागणी करून देखील दुरुस्ती केली जात नव्हती.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Work in progress to repair broken drainage pipe.
Nashik Crime News : कॉलेजरोड परिसरात वीजचोरीचा पर्दाफाश गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल

ड्रेनेजमधील दुर्गंधीयुक्त पाणी या खड्ड्यात साचल्याने येथील रहिवाशांना घरात राहणे देखील मुश्कील झाले होते. रात्रीच्या वेळी तर जेवण देखील जात नव्हते. ‘सकाळ’ मध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच दुरुस्ती हाती घेण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी ‘सकाळ’ चे आभार मानले. दरम्यान या कामातच काही ठिकाणी तुटलेल्या विजेच्या केबल्स देखील दुरुस्त करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Work in progress to repair broken drainage pipe.
Nashik Fraud Crime : सायबर पोलिसिंगमुळे मिळाले 5 लाख परत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com