नासाकाचे नूतनीकरण युद्धपातळीवर; शेतकऱ्यांची ऊस लागवड जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cooperative Sugar Factory about to start farmers focusing on sugarcane cultivation Nashik News

नासाकाचे नूतनीकरण युद्धपातळीवर; शेतकऱ्यांची ऊस लागवड जोमात

नाशिक रोड : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याच कृतीचा कारखान्यासह एकूणच नाशिक तालुका व जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीला हातभार लागणार आहे. सध्या नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik Cooperative Sugar Factory) नूतनीकरणाचे (renovation) काम युद्धपातळीवर सुरू असून, अल्पावधीतच हा कारखाना निर्मिती प्रक्रियेत सक्रिय होणार आहे.

नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्याबाबत झालेल्या निर्णयाचे कार्यक्षेत्रातील सर्वच घटकांनी स्वागत केले आहे. शेतकरी व सभासदांनी ऊस लागवडीचे प्राधान्य देत कामगारांनीही कंपनीच्या मागणीनुसार वेळोवेळी मदत करण्याची भूमिका स्वीकारली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह नाशिक साखर कामगार युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे व इतरांनी कारखान्याच्या ऊर्जितावस्थेला गोष्ट देण्यासाठी हिरिरीने लक्ष घातले आहे.

हेही वाचा: Nandurbar | ST आगारात 400 कर्मचारी हजर

जिल्हा बँकेचे प्रशासकीय अधिकारी अरुण कदम यांनी कारखाना सुरू करण्याबाबत घेतलेली भूमिका, दीपक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स यांनी याकामी दिलेला प्रतिसाद खासदार हेमंत गोडसे (MP Hemat Godse), आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांनी केलेले प्रयत्न यामुळेच शेतकरी, कामगार, छोटे- मोठे व्यवसायिकांचे जीवनात पुनश्च आनंदाचे दिवस सुरू होत आहे. २ एप्रिलला कारखाना गेट उघडल्यानंतर तीन तारखेपासून युद्धपातळीवर कारखाना दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. कारखान्यास आवश्यक ऊसपुरवठा करण्याची जबाबदारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. यासाठी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात आडसाली तसेच सप्टेंबर ते डिसेंबरअखेर अर्ली सुरू उसाची को. ८६०३२ या जातीची जास्तीत- जास्त लागवड करावी. तसेच ज्या शेतकऱ्याकडे खोडवा ऊस आहे. त्यांनी कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नोंद करावी. तसेच आवश्यकतेनुसार कामावर बोलाविलेल्या कामगारांनी हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: उन्हाच्या झळा पशु- पक्ष्यांच्या जीवावर | Nashik

सकारात्मक भूमिका

जिल्हा बँक व कारखाना कामगार युनियन, कामगार सोसायटी, पीएफ फंड कार्यालय यांचे प्रश्न व सुप्रिम कोर्टात (Supreme Court) जमा केलेल्या रकमेबाबत खा. गोडसे यांनी संबंधित अधिकारी तसेच सुप्रिम कोर्टातील वकील यांच्यासोबत दिल्लीत बैठका घेऊन लवकरात लवकर कामगारांना व बँकेलाही कोर्टातील रक्कम मिळावी याकामी मध्यस्थी केलेली आहे. जिल्हा बँकेनेदेखील सकारात्मक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा: मालेगाव महानगरपालिकेला लाभले दोन उपायुक्त; सहाय्यक आयुक्त पद रिक्तच

सभासद व कामगारांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे, कार्याध्यक्ष शिवराम गायधनी, माजी उपाध्यक्ष संतू पाटील, सोसायटी चेअरमन देवकिसन गायखे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष नामदेवराव बोराडे, शंकरराव रोकडे, शरद पगार, भाऊसाहेब आडके, दत्तात्रेय कर्पे, कांतिलाल गायधनी, शिवाजीराव म्हस्के, नामदेवराव गायधनी, उत्तमराव सहाणे, भाऊसाहेब गायकवाड, शरदराव टिळे, माणिकराव कासार, ज्ञानेश्वर गायधनी, संजय तुंगार, अशोकराव जाधव, अशोक खालकर, बाजीराव बरकले, तुकाराम गायधनी आदींनी केले आहे.

Web Title: Cooperative Sugar Factory About To Start Farmers Focusing On Sugarcane Cultivation Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..