कोरोना कामासाठी शिक्षकांना हवीय 1 तास ड्यूटी!

3 शिफ्टमध्ये नियुक्त करण्याचा महापालिकेचा निर्णय
teachers
teachersteachers

नाशिक : कोरोना रुग्णांना बेड मिळण्यासाठी महापालिकेच्या सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिमवर काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या आठशे शिक्षकांपैकी अनेकांनी इतर कामांचे दाखले देत काम करण्यास नकार देताना द्यायचेच असेल तर एक तास काम द्यावे, अशी मागणी केली.

800 शिक्षकांना खासगी रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये नियुक्त करण्याचा निर्णय

या संदर्भात स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्याशी शिक्षक चर्चा करणार असून, यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांना खासगी कोविड सेंटरमध्ये बेड मिळावेत, यासाठी महापालिकेने सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिम (सीबीआरएस) कार्यान्वित केली आहे. रुग्णालयांना दररोज २४ तासांतील बेडची स्थिती सीबीआरएस सिस्टिमवर लोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या डॅशबोर्डवर रिक्त बेड दिसतात, परंतु प्रत्यक्षात मात्र बेड शिल्लक नसल्याचे कारण दिले जाते. बेड मिळाला तरी सरकारी दराप्रमाणे दर आकारण्याऐवजी नियमित २० टक्के रिक्त बेडचा दर लावला जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सीबीआरएस अधिक सक्षम करण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या आठशे शिक्षकांना खासगी रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षक तीन शिफ्टमध्ये नियुक्त करणार

परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने शिक्षकांनाच कोविड रुग्णालयांमध्ये नियुक्त करून त्यांच्यामार्फत सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिम सुरळीत करण्याचा निर्णय घेतला. विभागनिहाय शिक्षकांची नियुक्ती करून प्रत्येक रुग्णालयात तीन शिक्षक तीन शिफ्टमध्ये नियुक्त केले जाणार आहेत. प्रभाग पातळीवर सीबीआरएस सिस्टिमवर अद्ययावत माहिती लोड केल्यांतर पालिका मुख्यालयातील मुख्य सिस्टिमचा डाटा अद्ययावत करणे, असे नियोजन आहे. महापालिकेने शिक्षकांना नियुक्तिपत्रदेखील दिले. त्यासाठी बुधवारी (ता. १४) सुटीचा दिवस असून, प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. त्यासाठी पालिका मुख्यालयात आदेश मिळालेल्या सर्वच शिक्षकांनी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. बहुतांश शिक्षकांनी नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. महापौर सतीश कुलकर्णी व स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचीदेखील भेट घेऊन शिक्षकांना रुग्णालयांमध्ये अधिक काळ सेवा न देण्याची मागणी केली. सभापती गिते यांच्या समवेत गुरुवारी (ता. १५) शिक्षक प्रतिनिधींची बैठक होणार असून, त्यात निर्णय घेतला जाणार आहे.

शिक्षकांच्या मागण्या

ऑनलाइन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी असल्याने सीबीआरएस ड्यूटी एक तासाची करावी, महिला शिक्षकांना रात्रपाळीतील ड्यूटी देऊ नये, दुर्धर आजाराने ग्रस्त शिक्षकांना वगळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com