Accidental Black Spot : ‘ब्लॅक स्पॉट’ मुक्तीसाठी अडीच कोटींचा खर्च | Cost of two half crores to get rid of Accidental Black Spot nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident Black Spot

Accidental Black Spot : ‘ब्लॅक स्पॉट’ मुक्तीसाठी अडीच कोटींचा खर्च

Accidental Black Spot : पंचवटी विभागातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची हॉटेल चौकात झालेल्या बस दुर्घटनेनंतर शहरात अपघाताचे २६ ‘ब्लॅक स्पॉट’ शोधण्यात आले.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्त केले जाणार आहे. (Cost of two half crores to get rid of Accidental Black Spot nashik news)

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हॉटेल मिरची चौक येथे ऑक्टोबर २०२२ मध्ये बस दुर्घटनेत बारा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत शहरातील सर्वच रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट शोधण्याचे सूचना केल्या.

त्याअनुषंगाने झालेल्या सर्वेक्षणात २६ ब्लॅक स्पॉट आढळून आले. ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपाय योजना सुचविण्यासाठी रेजिलिएंट इंडिया कंपनीची नियुक्ती करण्यात आली. कंपनीने ४५ दिवस सर्वेक्षण करून महापालिकेला अहवाल सादर केला.

२६ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी तीन वर्षातील अपघातांचे प्रमाण, त्यामागील कारणे व रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांची संख्या, वाहतुकीची कोंडीची कारणे या बाबींच्या अभ्यास करून उपाययोजना सुचविल्या. उपाययोजना अमलात आणण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, अडीच कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. अशी माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

उपायोजनांमध्ये ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्यासाठी गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मो प्लॅस्टिक पेंटने पट्टे मारणे, रोड मार्कर बसविणे, सूचना फलक व नो- पार्किंग फलक लावणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहे. २३ ब्लॅक स्पॉटवर सिग्नलदेखील बसविले जाणार आहे.

टॅग्स :Nashikaccident case