Nashik News: पांढऱ्या सोन्याचा भावाला मिळेना उसळी; आहे त्या भावात कापूस विकण्याची उत्पादकांवर वेळ

Lubhan Nikam, a cotton farmer from Bhilkot, stored cotton in the hope that the price would increase.
Lubhan Nikam, a cotton farmer from Bhilkot, stored cotton in the hope that the price would increase.esakal

Nashik News : पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापसाला बाजारात नेहमीच सुमारे दहा हजार रुपये क्विंटलचा अधिक भाव राहिला आहे.

त्यामुळे काही झाले तरी दहा हजारांतच कापूस विकायचा ठाम निर्माण घेऊन तब्बल चार महिने घरातच कापूस घरातच साठवून ठेवल्यानंतरही बाजारात कापसाच्या दराला सात हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळत नसल्याने बाजारात आहे त्याच भावाने व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात आहे. सहा महिन्यापासून कापूस दर प्रचंड प्रमाणात घसरलेले आहेत.

मागच्या वर्षी दहा हजाराच्या पुढे कापूस तर आता दर ७ हजारच्या आसपास आहे. यातच भाव वाढीची प्रतीक्षा आता संपल्याने आहे त्या भावात कापूस विकण्याची उत्पादकांवर वेळ आलेली आहे. कापसाला दर नसल्याने बळिराजा त्रस्त झाला आहे. (cotton not available for brother time for producers to sell cotton at that price Nashik News)

मागील वर्षी कापसाला सुमारे ९ ते १० हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. यामुळे याही वर्षी हाच भाव कायम राहील असे उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती. मात्र सहा महिन्यापासून कापसाचा भाव गडगडलेले आहे.

त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस या भावात न विकता तो साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील सहा महिन्यापासून कापसाच्या भावाला उसळी मिळत नसल्याने भाव हे सहा ते सात हजार रुपयांवर स्थिर आहे.

व्यापाऱ्यांकडून देखील तोच भाव आहे. आता नवीन खरिपाचा हंगाम सुरू होणार यंदा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बँक, सेवा सोसायटी, व्यापारी तसेच उसनवारी पैसाही परत फेड न झाल्याने तसेच बी-बियाणे, खतांसाठी पैसे लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lubhan Nikam, a cotton farmer from Bhilkot, stored cotton in the hope that the price would increase.
Summer Business : उन्हाच्या चटक्याने लोखंडी कुलर वाढली मागणी; दरात 20 टक्के वाढ

यातच वाढत्या उन्हामुळे कापसाच्या वजनात घट देखील झपाट्याने होत आहे. त्यामुळे शेतकरी आहे त्या भावात कापूस विकून हात मोकळे करीत आहेत.

आर्थिक जुळवाजुळव करण्याची चिंता

तीव्र उन्हामुळे वजन घटले आहे, पडलेले दर वाढलेले व्याज आणि घटलेले वजन असा तिहेरी फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

आता नवीन खरीप हंगाम सुरू होत आहे. या हंगामात पेरणीसाठी व शेती मशागतीसाठी कुठे कर्ज उपलब्ध होईल. या चिंतेमध्ये शेतकरी त्रस्त झाला आहे. पांढऱ्या सोन्याच्या घसरलेल्या भावामुळे बळिराजा आर्थिक घडी कोलमडली आहे.

Lubhan Nikam, a cotton farmer from Bhilkot, stored cotton in the hope that the price would increase.
Gram Panchayat Bypoll Election : श्रीरामपूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com