कोव्हिशील्डचा दुसऱ्या डोसचा कालावधी वाढविला; गर्दी न करण्याचे आवाहन

covishield
covishieldesakal

नाशिक : केंद्र सरकारतर्फे कोव्हिशील्डचा (Covishield) दुसरा डोस घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. शनिवार (ता.१५) पासून शहरातील सर्व आरोग्य केंद्रांवर आता कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा करण्यात आला आहे. (Covishield dose only after 84 days)

covishield
चिंचोलीचे जवान अमोल झाडेंना सिक्कीमध्ये वीरगती

८४ दिवसानंतरच कोव्हिशील्डचा डोस

१५ मे या तारखेच्या आधी कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता ८४ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस मिळणार आहे. १५ मेपासून ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले असतील त्या नागरिकांनाच कोव्हिशील्डचा दुसरा डोस मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन या लसीचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर पूर्वीप्रमाणे २८ ते ४२ दिवसच राहणार आहे. ज्या नागरिकांचे कोव्हिशील्ड डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले नसतील, त्या नागरिकांनी केंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

covishield
Sakal Impact : कोरोनात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 'विमाकवच’ला अखेर मुदतवाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com