
Invitation Card : QR Code असलेल्या निमंत्रण पत्रिकेची क्रेझ! कार्यक्रमाचे ठिकाण दर्शविण्यासाठी वाढता वापर
जुने नाशिक : ऑनलाइन तंत्रप्रणाली आणि आधुनिकीकरणाचा परिणाम निमंत्रण पत्रिकेवरदेखील दिसू लागला आहे. क्यूआर कोड असलेल्या निमंत्रण पत्रिकेची सध्या क्रेझ दिसून येत आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण दर्शविण्यासाठी विशेषतः निमंत्रण पत्रिकेवर क्यूआरकोडचा वापर केला जात आहे. वास्तुशांती निमंत्रण असलेली अशीच एक पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. (Craze of invitation card with QR Code Increasingly used to indicate location of an event Nashik News)
आधुनिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात तसेच कार्यात ऑनलाइन पद्धती रूढ होत चालली आहे. छोट्यापासून तर मोठ्या कामांपर्यंत खासगी शासकीय कामात ऑनलाइन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
स्पष्टता आणि कमी वेळेत कामे करून घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अधिकतम वापर होत आहे. निमंत्रण पत्रिकादेखील यातून सुटलेल्या नाही. सोशल मीडियावर काही निमंत्रण पत्रिका अशा आहेत, की केवळ किंवा कोड येत आहे तो स्कॅन केला की संपूर्ण पत्रिका डोळ्यासमोर येत आहे.
तर काही छापील निमंत्रण पत्रिकेवरही प्रत्यक्ष क्यूआरकोड छापण्यात आला आहे. अशीच एक वास्तुशांती निमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अतिशय साध्या पद्धतीचे पत्रिका छापण्यात आली आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
असे असले तरी एका गोष्टीमुळे ती पत्रिका सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. ती गोष्ट म्हणजे त्यावर असलेले क्यू आर कोड. निमंत्रण पत्रिकेवर क्यूआर कोड का दिले असावे, त्यात कुठली माहिती आहे.
या उत्सुकतेपोटी बहुतांशी जणांचे उत्कंठा वाढून त्यांच्याकडून लगेचच निमंत्रण पत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन करताना दिसले. स्कॅन केल्यानंतर लक्षात येते की, त्यात कार्यक्रम स्थळाचा गुगल मॅप नकाशा देण्यात आला होता.
जेणेकरून निमंत्रण प्राप्त झालेल्यांना कार्यक्रम स्थळ शोधण्यास कुठलीही अडचण येणार नाही. तसेच कुणाची मदत न घेता त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा कोड स्कॅन करून गुगल मॅपच्या आधारे त्यांना कार्यक्रम स्थळी पोचणे सोयीचे होईल. असा उद्देश ठेवून अशा प्रकारची निमंत्रण पत्रिका तयार केली असल्याचे पत्रिका तयार करणाऱ्यांकडून सांगण्यात आले.