Nashik Crime News : पोलिस सुस्तावल्याने भरदिवसा गुंडागर्दी; भररस्त्यावर टोळक्यांच्या हाती हत्यारे

Crime News
Crime NewsSakal

नाशिक : कार्बन नाका परिसरात भरदिवसा कारने पाठलाग करून दोघांवर गोळीबाराची घटना घडल्यानंतर, रविवारी (ता. २६) अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमन्स कंपनीसमोर पानटपरी चालकाने रुपया जास्त घेतल्याच्या कारणावरून संशयितांनी थेट तलवारीने दुकानात घुसून हल्ला केल्याची घटना घडली.

भरदिवसा घडलेल्या या घटनेने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, सुस्तावलेल्या पोलिसांमुळे शहरात गुंडागर्दी वाढल्याचे बोलले जात आहे.

Crime News
Nashik Crime News: कोयता गँगची बेकरी चालकाला मारहाण

अंबड परिसरात धारदार कोयते, तलवारी हत्यारे घेऊन दहशत माजविल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या आठवड्यात सिडकोत महाकाली चौकात कोयता घेऊन फिरणार्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यास अटक करून कारवाई करण्यात आली. मात्र, शहरात सर्रास कोयत्याने वार करण्याच्या घटनाही वाढल्याने शहरात पोलिस आहेत की नाहीत, असाच प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

शहरात गुन्हेगारी घटना पुन्हा वाढू लागल्याचे चित्र असून, टवाळखोरांच्या हातांत हत्यारे दिसू लागली आहेत. एवढेच नव्हे तर किरकोळ वाद वा मागील भांडणाच्या कुरापती काढून टोळक्यांकडून कोयत्यानेच वार करण्याचे प्रकार वाढले आहेत.

Crime News
Nashik Crime News: ऐकाव ते नवलचं! चक्क मोबाईल चोराने दिल नवीन फोन घरी आणून देण्याच आश्वासन

कोयत्यासह हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या टोळक्यांच्या हाती इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारे बाळगून वावरतात. या बाबींची पोलिसांना सुतराम माहिती नसावी, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होते आहे. शहर पोलिसांच्या सुस्तावलेपणामुळे अशा टवाळखोरांच्या माध्यमातून शहरात नव्याने गुंडागर्दी सुरू होऊन गुन्हेगारी वाढण्याचीच शक्यता आहे.

‘गुंडा’विरोधी पथक करतंय काय?

पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून आयुक्तालयात शहर गुन्हे शाखे व्यतिरिक्त ‘गुंडा’ विरोधी पथक नेमण्यात आले. असे असताना, टवाळखोर भररस्त्यावर हत्यारे बाळगत असल्याने व्यावसायिक- नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

लुटमारीसह किरकोळ कारणावरून धारदार हत्यारे व कोयत्याचा वापर मारहाणीत होतो आहे. त्यामुळे गुंडाविरोधी पथक नेमके काय करतेय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे सातत्याने गुन्हे दाखल होत असताना, पोलिसांकडून मात्र अशा टवाळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठीच्या कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.

पोलिसांची गस्ती पथकांसह विशेष पथके नेमलेली असतानाही टवाळखोरीला वेसण घालता आलेले नाही. सुस्तावलेल्या पोलिसिंगवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.

Crime News
Nashik Crime News : दिवसा वीटभट्टीवर काम अन्‌ रात्री मोटारसायकलींची चोरी; नगर जिल्ह्यातून तिघांना अटक

''शहरात गुन्हेगारांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यत आलेले आहेत. टवाळखोरांविरोधातही कठोर कारवाई होते आहे. गेल्या काही वर्षातील तुलनात्मक आढावा पाहता सद्यःस्थितीत शहराचा क्राईम रेट कमी आहे. मात्र गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.'' - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com