Nashik Crime News : घरफोडी, चोरी संशयितांना अटक; आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Nashik Crime News : घरफोडी, चोरी संशयितांना अटक; आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी (जि. नाशिक) : आडगाव गुन्हे शोध पथकाने घरफोडी (Robbery) व चोऱ्या करणाऱ्या दोन संशयितांना अटक करून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील १९ गॅस सिलेंडर, पातेले व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी असा ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. (crime investigation team has arrested 2 suspects of burglary and theft nashik crime news)

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, पोलिस नाईक सुरांजे, पोलिस अमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाकचौरे, कुंदन राठोड आडगाव पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या चार गुन्ह्याचे उकल करण्याचे उद्देशाने सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत होते.

यात दोघेजण संशयितरित्या हालचाली करताना आढळून आले, या संशयितांच्या वर्णनाचा अभ्यास करून जवळपास दोन दिवस सापळा रचला. संशयित कैलास नंदू गायकवाड (वय २०, रा. पंचशील नगर, गंजमाळ, नाशिक) यास ताब्यात घेत चौकशी केली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

यात गुन्ह्याची कबुली देत साथीदार रोशन सुधाकर कटारे (वय २२, रा. विडीकामगार, नाशिक ) सह चोरी व घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार रोशन कटारे यास देखील ताब्यात घेण्यात आले. या दोन संशयितांकडून जवळपास ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

टॅग्स :Nashikcrimerobberythief