esakal | खुंटेवाडीतील शेतकरी मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; नातेवाईकही ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

crime

खुंटेवाडीतील शेतकरी मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

देवळा (जि.नाशिक) : तालुक्यातील खुंटेवाडी येथील दीपक ढेपले या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूबाबत केलेल्या आंदोलनानंतर देवळा पोलिसांनी अज्ञातांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच, मृतदेहाची हेळसांड केल्याप्रकरणी त्या तरुणाच्या नातेवाईइकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.(crime-of-manslaughter-in-farmer-death-marathi-news-jpd93)

अज्ञातावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सोमवारी (ता.१२) दीपक ढेपले या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता.१३) घातपाताचा संशय घेत याबाबत तपास करावा व संशयितांना पकडावे, या मागणीसाठी दिवसभर नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात केलेली गर्दी व पाच कंदील येथे केलेला रास्ता रोको तसेच, उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास केलेला विलंब या सर्व बाबींमुळे दोन दिवस हे प्रकरण चर्चेत होते. पोलिस यंत्रणेवरही ताण होता. यादरम्यान पोलिसांनी ढेपले मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असून, मृताच्या वडिलांसह इतर २० जणांवरही गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपअधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक महेश निकम तपास करत आहे.

सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

देवळा पाच कंदील ते देवळा शहराच्या तीन बाजूंना जाणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यान्वित असती, तर या घटनेविषयी गूढ निर्माण झाले नसते. चोरी, खून, घात-अपघात अशा घटनांत आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतात. एक सबळ पुरावा म्हणून त्याचा उपयोग होतो. त्यामुळे या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवत ते कार्यान्वित व्हावेत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील यांच्या ‘डीनर डिप्लोमसी’ साठी फिल्डिंग!

हेही वाचा: भाजप, शिवसेनेत पक्षांतर्गत पेच; आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर

loading image