Nashik Crime News : ‘त्याचा’ गेम करणारच.... ज्वाल्याच्या खुनाचा घ्यायचा सूड....!

crime
crime sakal

Nashik Crime News : सिडकोत भाजपचा पदाधिकारी व सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळी झाडणाऱ्या मुख्य संशयिताला अहमदनगरमधून अटक करण्यात आली आहे. (criminal arrested who fire on kashti from ahmednagar nashik crime news)

शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी या प्रकरणात आत्तापर्यंत १३ संशयितांना अटक केली असून, दोन वेळा बचावलेल्या कोष्टीचा गेम करणारच, असा निर्धारच अटक करण्यात आलेल्या संशयितांचा असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हेगारांशी संबंधित ‘व्हाइट कॉलर’ राजकीय नेत्यांच्या मागेही पोलिस चौकशीचा फेरा लागल्याची शक्यता असून, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

सिडकोतील बाजीप्रभू चौकात गेल्या १६ एप्रिलला सकाळी साडेनऊच्या सुमारास मोपेडवरून जाणारा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर मुख्य संशयित सागर पवार याने दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून कोष्टी बचावला, तर संशयित पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी जया दिवे, विकी ठाकूर, गौरव गांगुर्डे व किरण क्षीरसागर यांना अटक केली.

परंतु मुख्य संशयित सागर पवार यांच्यासह या प्रकरणातील संशयित पसार होते. यातील मुख्य सूत्रधार व संशयित किरण दत्तू शेळके, सचिन पोपट लेवे (रा. पंचवटी), किशोर बाबूराव वाकोडे (कथडा), राहुल अजयकुमार गुप्ता (पंचवटी), अविनाश गुलाब रणदिवे (सातपूर), श्रीजय ऊर्फ गौरव संजय खाडे (जुना आडगाव नाका), जनार्दन खंडू बोडके (पंचवटी) यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime
Nashik Bribe Crime : सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी गागरे लाच लुचपतच्या जाळ्यात; 50 हजारांची लाच घेताना अटक

तर, कोष्टीवर गोळी झाडणारा सागर पवार आणि त्याचा साथीदार पवन पुजारी या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अहमदनगरमधून अटक केली. हल्ला केल्यानंतर संशयित पसार झाले होते. गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, प्रदीप ठाकरे यांनी सागरला अहमदनगरमधून अटक केली.

सहा महिन्यांपासून कट

राकेश कोष्टी याचा गेम करण्यासाठी दिवे टोळीकडून गेल्या सहा महिन्यांपासून कट रचला जात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. त्याचप्रमाणे, कोष्टी याच्यावर दिवे टोळीकडून पाळत ठेवली जात होती. गेल्या १५ तारखेलाच त्याच्या गेम करण्यात येणार होता; परंतु तो निसटला. त्यानंतर लगेचच १६ तारखेला सकाळी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातही तो बचावला. असे असले तरी त्याचा गेम करणारच, असेच संशयितांच्या चौकशीतून समोर येत आहे.

सूड उगवायचाय

पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले याचा २०१५ मध्ये इगतपुरी परिसरात जंगलात खून करण्यात आला होता. यात राकेश कोष्टीचा सहभाग होता. ज्वाल्याच्या खुनाचा सूड उगवायचा असल्याने या संशयितांच्या रडारवर राकेश कोष्टी असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते आहे. याशिवाय, कोष्टी-दिवे टोळीत हप्ता वसुलीतूनही वाद शिगेला पोचला असून, याशिवाय राजकीय किनारही या हल्ल्यामागे असल्याचे बोलले जात आहे.

crime
Nashik Bribe Crime : नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी केदार लाचलुचपतच्या ताब्यात

‘राजकीय’ नेते रडारवर

राकेश कोष्टी सध्या भाजपच्या एका संघटनचा मुख्य पदाधिकारी आहे. राजकीय वर्तुळात गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या गुन्हेगारांचा वावर गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. त्याच मार्गाने कोष्टी जात असताना त्यातून दिवेच्या मार्गात अडथळे आणले जात असल्याचे काही घटनांवरून समोर येत आहे. त्यातूनच दिवे टोळीने कोष्टीवर हल्ला केल्याचे बोलले जाते.

त्यामुळे या प्रकरणात काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर येत असून, पोलिसांनी काहींची प्राथमिक चौकशीही केली आहे. मात्र आणखीही काही नेते पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच त्यांचीही कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोष्टी-दिवे या गुन्हेगारी टोळीशी संबंधित असणाऱ्या ‘व्हाइट कॉलर’ राजकीय नेत्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

crime
Nashik Crime News : रागाच्या भरात पत्नीच्या हातांची बोटे कापली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com