महावितरणच्या इ-सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद; ग्राहकांनाही सोयीस्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mseb

महावितरणच्या ई-सुविधेला चांगला प्रतिसाद; ग्राहकांनाही सोयीस्कर

नामपूर (जि. नाशिक) : वीज वितरण कंपनीच्या(MSEB) अनागोंदी कारभाराच्या अनेक सुरस कथा ग्रामीण भागात पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहकांना देण्यात येणारी अव्वाच्या सव्वा बिले ही नित्याची बाब झाली आहे. यावर उपाय म्हणून ग्राहकांनी स्वतःहून आपल्या मीटरचे रीडिंग(meter reading) वीज वितरण कंपनीकडे पाठविण्याच्या आवाहनास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Customer response to MSEDCL e-facility Self-sent electricity bill readings)

इ-सुविधेचा वापर ग्राहकांना सोयीस्कर

गेल्या एप्रिलमध्ये दोन लाख दोन हजार ७४२ ग्राहकांनी मोबाईल ॲप(mobile app), वेबसाईट (website) व ‘एसएमएस’द्वारे(SMS) मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठविले आहे. यामध्ये राज्यातील सर्वाधिक पुणे परिमंडळातील ४९ हजार ९५०, तर नाशिक परिमंडळातील २२ हजार ३३० वीजग्राहकांचा समावेश आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रीडिंग पाठविण्याची मुदतही चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. यापूर्वी मार्चमध्ये एक लाख ३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिलमध्ये ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली.

हेही वाचा: "क' जीवनसत्त्व असलेल्या लिंबाला आला भाव ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतोय वापर

परिमंडळनिहाय ग्राहकांची संख्या

एप्रिलमध्ये राज्यातील दोन लाख दोन हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठविले आहे. यात पुणे परिमंडळामधील ४९९५०, कल्याण- २८९१६, नाशिक- २२३३०, भांडूप- १८०९३, बारामती- १३७३३, जळगाव- १०८७७, औरंगाबाद- १०१००, कोल्हापूर- ८४७०, नागपूर- ७२६९, अकोला- ७१८०, लातूर- ६०८५, अमरावती- ५६६२, कोकण- ४२२३, गोंदिया- ३४६४, नांदेड- ३२६२ व चंद्रपूर परिमंडलातील ३१३८ वीजग्राहकांचा समावेश आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांना Black fungusचा धोका? जाणून घ्या लक्षणे

''रीडिंग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यांसह विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग पाठवावे.''

- नितीन सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, महावितरण

Web Title: Customer Response To Msedcl E Facility Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusNashikMSEB
go to top