esakal | "बच्चू कडूंच्या भावना रास्त आहेत, त्याबाबत चौकशी केली जाईल" कृषिमंत्र्यांनी घेतली दखल 
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu-kadu.jpg

"बच्चू कडू यांच्या भावना रास्त आहेत. त्याची दखल आम्ही घेतली आहे. त्याबाबत चौकशी केली जाईल. त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधीतांकडे विचारणा केली जाईल. त्याबाबत कारवाई होईल. त्याबाबत निश्चित रहावे.  कृषीमंत्री भुसे यांनी बच्चू कडूंना आश्वासन दिले आहे. नेमके काय झाले?

"बच्चू कडूंच्या भावना रास्त आहेत, त्याबाबत चौकशी केली जाईल" कृषिमंत्र्यांनी घेतली दखल 

sakal_logo
By
संपत देवगिरे

नाशिक : "बच्चू कडू यांच्या भावना रास्त आहेत. त्याची दखल आम्ही घेतली आहे. त्याबाबत चौकशी केली जाईल. त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधीतांकडे विचारणा केली जाईल. त्याबाबत कारवाई होईल. त्याबाबत निश्चित रहावे.  कृषीमंत्री भुसे यांनी बच्चू कडूंना आश्वासन दिले आहे. नेमके काय झाले?

कृषिमंत्र्यांनी घेतली सुचनांची दखल 

बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकांची पाहणी केली. शेतकरी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.  यावेळी पिकांवर कीड आली आहे. अशा स्थितीत शेतकरी हवालदील झाला आहे. पिकांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी माहिती घेऊन पंचनामे करण्यासाठी बांधावर हवे होते. प्रारंभी उगवणीची समस्या होती. त्यानंतर कीडरोगांचा त्रास आहे. याबाबत शेतकरी वर्गात जनजागृती केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.सोयाबीन पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर यावरुन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करीत कृषी विभागावर ताशेरे ओढले होते. यासंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांनी, त्यांच्या सुचनांची दखल घेतली आहे. त्याची चौकशी होईल, असे सांगितले. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

त्याबाबत चौकशी केली जाईल.

यासंदर्भात कृषीमंत्री भुसे म्हणाले, राज्यमंत्री कडू यांच्या भावना रास्त आहेत. त्याची दखल आम्ही घेतली आहे. त्याबाबत चौकशी केली जाईल. त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधीतांकडे विचारणा केली जाईल. त्याबाबत कारवाई होईल. त्याबाबत निश्चित रहावे. दरम्यान बियाण्यांची उगवणक्षमता, बियाण्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया, त्याबाबतचे प्रयोग व निकष यांचा विचार केल्यास यंदा उपलब्ध होणारे बियाणे तीन ते चार वर्षे आधी तयार करण्याची प्रक्रीया सुरु झालेली असते. त्याबाबत कोणती व कशी कार्यवाही, चाचण्या घ्याव्यात हे केंद्र शासन ठरवते. यंदा अचानक बियाण्यांची मागणी वाढली. ती पूर्तता करताना धावपळ झाली. शेतकरी वर्गात स्वतःच्या शेतातील बियाणे वापरण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. त्या तुलनेत महाबीज सारख्या शासकीय संस्थांचा बियाणे विक्रीतील सहभाग ५ ते १० टक्के एव्हढा मर्यादीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने पूर्वतयारी केली असली तरीही, राज्याच्या विविध भागात बियाणे, उगवण व त्यानंतर किड या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर काय मार्ग काढायचा याबाबत कृषी विभाग मर्यादीत मनुष्यबळासह प्रयत्नशील आहे.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top