Sinnar Fire News: शेतात लागलेल्या आगीत झाडे जळाल्याने नुकसान; साग, आंबा, निमोणी, कडुलिंबाचा समावेश

Sinnar Fire News
Sinnar Fire Newsesakal

Sinnar News : कणकोरी (ता. सिन्नर) शिवारात शेतात लागवड केलेली साग, आंबे, निमोणी, कडुलिंबाची झाडे आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना रविवारी (ता. २६) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी लागवड केलेली ही झाडे होती. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Sinnar Fire News
Nashik Crime News : पोलिस सुस्तावल्याने भरदिवसा गुंडागर्दी; भररस्त्यावर टोळक्यांच्या हाती हत्यारे

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले गोविंद सुखदेव सांगळे (वय ३३) यांच्या मालकीचे कणकोरी शिवारात गट नंबर २२० मध्ये शेतजमीन क्षेत्र आहे. या शेतात त्यांच्या वडिलांनी पंधरा वर्षांपूर्वी साग, आंबा, निंबोणी, कडुलिंब आदींची सुमारे सहाशे झाडे लावली होती. (Latest Marathi News)

या झाडांची पूर्ण वाढ झाली असून, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आंबा फळाचे उत्पादन देखील मिळत आहे. यंदाही आंबा मोहोर चांगल्या पद्धतीने आल्यामुळे सांगळे कुटुंबीयांना आश्‍वासक उत्पन्नाची हमी होती. मात्र, रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कुणीतरी येथे आग लावल्याने बागेत वाढलेले गवत व झुडपांनी पेट घेतला.

Sinnar Fire News
Dhule News : लळिंग कुरणातील आग; 5 हेक्टरांवरील गवत खाक

याबाबत अनिकेत बुचकूल या मित्राने सांगळे यांना कळवले. योगायोगाने श्री. सांगळे सुट्टीवर नाशिक येथे आलेले होते. त्यांनी आई-वडिलांसह तातडीने गावी जाऊन शेतात भेट दिली. संपूर्ण क्षेत्रात असलेले गवत पेटत गेल्याने उंच वाढलेल्या झाडांची पालवीदेखील भाजून निघाली.

सुमारे दोनशेपेक्षा जास्त विविध झाडांचे या आगीत नुकसान झाले असून, जवळपास चार लाखांचा फटका बसल्याचे सांगळे यांनी सांगितले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रामनाथ कांदळकर तपास करत आहेत.

Sinnar Fire News
Nashik News : पांजरपोळ वाचविण्यासाठी नाशिककर सरसावले; पन्नासहून अधिक संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com