
Unseasonal Rain Damage : सुरगाणा तालुक्यात अवकाळीने झोडपले; 2 तास पाऊस
Unseasonal Rain Damage : तालुक्यात गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण असून सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शुक्रवारी (ता. ५) दीड ते दोन तास झोडपून काढले. (Damage Surgana taluka hit by unseasonal rain 2 hours of rain nashik news)
उंबरठाण, बाऱ्हे, पळसन, बोरगाव, चिंचले, बर्डीपाडा, खुंटविहीर, सुरगाणा शहर परिसर, अलंगुण, पिंपळसोंड या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने लग्न समारंभाला हजेरी लावणाऱ्या वऱ्हाडी मंडळीची रोजच तारांबळ होताना दिसून येत आहे.
या पावसाने जनावरांचा चारा, भाताचे तनस, भाताच्या पेंढ्या, आंबा फळ बागेचे नुकसान झाले असून आंबा फळावर डाग पडल्याने भावात घसरण होणार असल्याची स्थिती आहे. कांदा, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, शेती फळ बागेचे अतोनात नुकसान झाले आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
तसेच, भाताची रोपे तयार करण्यासाठी झाडाच्या फांद्या, पालापाचोळा, शेण जाळून राब भाजणी केली जाते या शेती कामात व्यत्यय निर्माण झाला असून गोवरला वाळवी लागल्याने शेणाची माती झाली आहे.
या अवकाळीने गेल्या महिन्यात चक्रीवादळात सापडलेल्या घरांवरील पत्रे उडून गेले होते. ते अद्याप न ठेवल्याने अनेकांच्या घरातील सामान भिजले आहे. तर परिसरातील वीटभट्टीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या होणाऱ्या पावसामुळे आजाराचेही प्रमाण वाढले आहे.