लस घेतलेल्यांनाच सप्तशृंगदेवीचे दर्शन

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन देवीदर्शनासाठी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत.
saptashrungi devi
saptashrungi devisakal
Summary

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन देवीदर्शनासाठी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत.

वणी - साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर (saptashrungi) प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन देवीदर्शनासाठी (Darshan) पुन्हा कडक निर्बंध (Restriction) लागू केले आहेत. आदिमायेचे दर्शन आता कोविड डोस (Covid Dose) घेतलेल्यांनाच मिळणार असून, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील बालकांना मंदिरात प्रवेशबंदी (Entry Ban) करण्यात आली आहे.

शासनाच्या मंदिर दर्शनासाठी जारी केलेल्या नियमावलींनुसार सप्तशृंगदेवी विश्‍वस्त संस्थेतर्फे कोविड आनुषंगिक बाबींची पूर्तता करताना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आदेशांची पूर्तता केली असून, भाविकांनी गर्दीच्या नियोजनात आवश्यक ते सहकार्य मिळावे, या हेतूने विश्‍वस्त संस्थेने www.ssndtonline.org संकेतस्थळावर ई-दर्शन पास उपलब्ध करून दिले आहेत.

saptashrungi devi
नाशिक : सामाजिक संस्थांची आदिवासींना मदत

भाविकांनी ई-दर्शन/ऑनलाइन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे, तसेच लसीकरणाचे किमान एक किंवा दोन डोस पूर्ण केलेल्या भाविकांना श्री भगवती मंदिरात प्रवेश उपलब्ध आहे. ज्या भाविकांना श्री भगवती मंदिर दर्शनरांगेत रोपवे अथवा पायी प्रवेश करावयाचा असेल त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे. वय वर्षे १० पेक्षा कमी, तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह कोविड नियमावलीचे पालन बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती देवी ट्रस्टने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com