Nashik News : मेनरोड परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ | dead body found on Main Road area Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead body found

Nashik News : मेनरोड परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Nashik News : मेनरोड धुमाळ पॉईंट परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मंगळवार (ता.११) साडेचार वाजता घटना उघडकीस आली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (dead body found on Main Road area Nashik News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

धुमाळ पॉईंट भागात फुटपाथवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याचे परिसरातील व्यावसायिकांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाची पाहणी केली. त्याची ओळख पटेल अशी कुठलीही गोष्ट त्यांच्याकडे आढळून आली नाही. काहींनी तो व्यक्ती दहिफुल परिसरात फिरत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी संपूर्ण परिसरात चौकशी करून मृत व्यक्तीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. कुठलीही माहिती हाती लागली नाही. तो फिरस्ता असल्याची शक्यता परिसरातील व्यवसायिकांनी व्यक्त केली.

दरम्यान मेनरोड परिसरात खून झाल्याची अफवा सर्वत्र पसरल्याने एकच खडबड उडाली. नानावली परिसरात बालिकेचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मेनरोड परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकूणच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी केली. असा कुठलाही प्रकार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस तसेच व्यावसायिकांनी सुटतेचा विश्वास सोडला. त्यानंतर मात्र हद्दीच्या वादावरून बराच वेळ मृतदेह नोंद रखडून होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेवटी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. नेहमी विविध घटनांना संदर्भात पोलीस ठाणे हद्दीचा वाद उफाळून येत असतो.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना संबंधित पोलीस ठाण्याचे हद्द कायमस्वरूपी समजून सांगणे आवश्यक आहे. हद्दीचा आलेख देखील बाळगल्यास अशा प्रकारच्या हद्दीच्या वादात कारवाई अडकून राहणार नाही.

टॅग्स :Nashikdead body found