CUET Exam : 'सी-युईटी' अर्जासाठी 12 पर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CUET Exam

CUET Exam : 'सी-युईटी' अर्जासाठी 12 पर्यंत मुदत

नाशिक : देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे घेतल्‍या जाणाऱ्या कॉमन युनिव्‍हर्सिटी एन्ट्रन्स टेस्‍ट (सीयुईटी) युजी २०२३ या परीक्षेचे संयोजन केले जाणार आहे.

२१ मेच्‍या सुमारास परीक्षा घेण्याचे नियोजित असून, इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी १२ मार्चपर्यंत मुदत असेल. (Deadline for CUET application till 12th nashik news)

केंद्रीय शिक्षण विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्‍या सूचनेनुसार 'एनटीए'मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण विभागाअंतर्गत येणारे केंद्रीय विद्यापीठ, अन्‍य सहभागी विद्यापीठे, इन्‍स्‍टिट्यूशन, ऑर्गनायझेशन, स्‍वायत्त महाविद्यालये यांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्‍ध होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. संगणकावर आधारित (कॉप्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा असणार आहे. परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असून, इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना येत्‍या १२ मार्चच्‍या रात्री नऊपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

याच दिवशी निर्धारित शुल्‍कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. पुढील टप्‍यात विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्‍तीसाठी १५ ते १८ मार्च या कालावधीत मुदत उपलब्‍ध करून दिली जाईल. परीक्षेसाठी शहरांचा तपशील ३० एप्रिलला जाहीर केला जाणार आहे.

२१ मेच्‍या सुमारास परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. इंग्रजी, हिंदीसह स्‍थानिक भाषांमधून प्रश्‍न सोडविण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असणार आहे.

टॅग्स :Nashikexam