Mahajyoti: महाज्‍योतीच्‍या पूर्व प्रशिक्षणासाठी 31 पर्यंत मुदत; या 2025 च्‍या परीक्षांसाठी केली जाणार तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahajyoti

Mahajyoti: महाज्‍योतीच्‍या पूर्व प्रशिक्षणासाठी 31 पर्यंत मुदत; या 2025 च्‍या परीक्षांसाठी केली जाणार तयारी

नाशिक : महात्‍मा ज्‍योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (महाज्‍योती) यांच्‍यातर्फे २०२५ मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्‍या ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. (Deadline up to 31 for Mahajyoti pre training Preparation will be done for jee cet neet 2025 exams nashik news)

राज्‍यातील इतर मागासवर्गीय, भटक्‍या जाती-विमुक्‍त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एमएचटी-सीईटी, जेईई, नीट २०२५ करिता पूर्व प्रशिक्षण योजना लागू आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत.

राज्‍यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यास अर्ज करता येईल. इतर मागासवर्गीय, विमुक्‍त जाती- भटक्‍या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी विद्यार्थी असावा. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर उत्‍पन्न गटातील असावे.

२०२३ मध्ये दहावीची परीक्षा देत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेशपत्र व नववीची गुणपत्रिकेसह अन्‍य आवश्‍यक कागदपत्रे जोडायची आहेत. विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे अपेक्षित आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

असा करता येईल अर्ज

महाज्‍योतीच्‍या संकेतस्‍थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन 'ॲप्लिकेशन फॉर एमएचटी-सीईटी/जेईई/नीट २०२५ ट्रेनिंग' ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असून, त्‍यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

असे असेल प्रशिक्षणाचे स्वरूप

महाज्‍योतीमार्फत एमएचटी-सीईटी, जेईई, नीट परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी महाज्‍योतीतर्फे निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दर दिवसाला ६ जीबी इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikJEECETNEET