Nashik Crime News: अज्ञातांच्या प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी मोगरे यांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News: अज्ञातांच्या प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी मोगरे यांचा मृत्यू

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात गुरुवारी रात्री रोहिणी इंडस्ट्रीजचे मॅनेजर योगेश मोगरे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला होता. उपचारादरम्यान मोगरे यांचा झाला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान हल्लेखोरांनी मोगरे यांची पळवून नेलेली किया कार वाडीवऱ्हे शिवारात सापडली असून तेथून संशयीत दुसऱ्या कारने पसार झाल्याचे समोर आले आहे.

रोहिणी इंडस्ट्रीजचे मॅनेजर असलेले योगेश मोगरे हे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पाथर्डी फाटा येथून इंदिरानगरकडे त्यांच्या किया कारने जात होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. त्यानंतर संशय त्यांनी मोगरे यांचीच किया कार घेऊन महामार्गाने मुंबईच्या दिशेने पसार झाले. गंभीर जखमी मोगरे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस संशयीतांचा शोध घेत असून त्यांनी पळवून नेलेली किया कार वाडीवऱ्हे शिवारात सापडली आहे. तेथून संशयीत दुसऱ्या कारने मुंबई व पुण्याच्या दिशेने फरार झाले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान पथकाने संशयतांनी वाडीवऱ्हेपासून पुणे मुंबईच्या दिशेने करतानाचा मार्ग दाखविला आहे. शहरात एकापाठोपाठ एक गुन्हेगारी घटना घडत आहेत. यामुळे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :NashikCrime News