VIDEO : "मला जगण्यासाठी पैसे द्या" कर्जबाजारी युवकाचा महिला कर्मचारीच्या गळ्याला चाकू लावत गोंधळ; थरार मोबाईलमध्ये कैद!

idbi bank cctv.jpg
idbi bank cctv.jpg

नाशिक : वेळ दुपारी दिड वाजेची.. एक पिवळा शर्ट आणि जिन्स पॅन्ट घातलेला व्यक्ती बॅकेत गेला.. त्याने प्रथम व्यवस्थापकांकडे जाउन थर्ड पार्टी पेमेंट विषयी माहीती घेतली नंतर तो निघून गेला. काही वेळानंतर पून्हा आला आणि व्यवस्थापकांच्या शेजारीच रोखपालाची खुर्ची असून त्यांच्या पाठीमागे येउन उभा राहिला. आणि मग असे काही घडले ज्याने एका क्षणासाठी साऱ्यांनाच धडकी भरली...हा सर्व प्रकार एका मोबाईलमध्ये कैद झाला आहे. पाहा VIDEO

कर्जबाजारी युवक बॅंकेत शिरला आणि मग...

महात्मा गांधी रोड वरील आयडीबीआय बॅकेत सोमवारी (ता.७) दुपारी दिडच्या सुमारास पिवळा शर्ट आणि जिन्स पॅन्ट घातलेला संशयित अशोक बॅकेत गेला त्याने प्रथम व्यवस्थापकांकडे जाउन थर्ड पार्टी पेमेंट विषयी माहीती घेतली नंतर तो निघून गेला काही वेळानंतर पून्हा आला आणि व्यवस्थापकांच्या शेजारीच रोखपालाची खुर्ची असून त्यांच्या पाठीमागे येउन उभा राहिला. त्यामुळे तृप्ती अग्रवाल यांनी इथे का उभे आहात असे विचारले असता, त्याने लपवलेला सुरा काढून तृप्ती यांच्या गळ्याला लावला डाव्या हाताने त्यांचा गळा पकडून दुसऱया दाताने सुरा लावून "मला जगण्यासाठी १० लाख रुपये हवे आहेत". मला पैसे काढून द्या असे म्हणत त्याने गोंधळ घातला.

 बॅकेतील महिला कर्मचाऱ्याला ओलीस धरुन १० लाख रुपयांची मागणी करण्याच्या या प्रकाराने बॅकेत गोंधळ झाला. बॅकेतील भावीक भिडे या कर्मचाऱ्याने त्यांना सोडण्याची विनंती करीत, संशयिताच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याने ओलीस धरलेल्या तृप्ती यांच्या हातावर वार केला. त्यामुळे विभागीय व्यवस्थापक प्रदीप चंदेले यांनी तुला जे पाहिजे ते देतो आधी त्यांना सोडा असे सांगितल्यावर त्याने महिलेला सोडले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्थिक विवंचनेतून वाढलेल्या आर्थिक-सामाजिक गुन्हेगारीचे नवे रूप

अमर अशोक बोडके तारवालानगर असे संशयिताचे नाव आहे. त्याने १० रुपयांसाठी आयडीबीआय बॅकेतील कर्मचारी तृप्ती अग्रवाल (वय ४०, सम्राट ट्रोपीकानो, शेरीन मेडोज गंगापूर रोड), यांच्या गळ्याला सुरा लावून मला पैशाची गरज आहे. १० लाख रुपये द्या अशी मागणी करीत, गोंधळ घातला. हा सगळा बॅकेतील कर्मचारी व ग्राहकांची चित्रित झाला आहे. आर्थिक विवंचनेने त्रस्त असलेल्या एकाने महात्मा गांधी रोडवरील आयडीबीआय बॅकेत जाउन थेट मॅनेजरच्या गळ्याला सुरा लावून ओलीस धरीत जगण्यासाठी १० लाख रुपये द्या असे म्हणत, बॅकेत तांडव केले. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निमित्ताने आर्थिक विवंचनेतून वाढत असलेल्या आर्थिक-सामाजिक गुन्हेगारीचे नवे रूप यानिमित्ताने पुढे आले आहे. 

तो बॅकांवर पाळत ठेवण्यात प्रयत्नशील
संशयित अमर बोडके याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीसांनी त्याची पूर्वइतिहास तपासला. त्याच्यावर एकही गुन्हा नाही कि, तो सराईत गुन्हेगार नाही मात्र काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेने त्रस्त असल्याने तो बॅकांवर पाळत ठेउन प्रयत्नशील होता. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहे. 

संपादन - ज्योती देवरे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com