Nashik News : धुळवडच्या दुर्गम डोंगरात आढळला अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह

Dead Body Found
Dead Body Foundesakal

Nashik News : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम असलेल्या धुळवड परिसरातील डोंगरांमध्ये कुजलेल्या अवस्थेतील पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दोन आठवड्याहून अधिक कालावधी पूर्वी सदर मृत्यू झाल्याचा संशय असून कुजल्यामुळे मृताच्या हाडांचे केवळ सापळे घटनास्थळी शिल्लक राहिल्याचे दिसून आले. (decomposed body of unknown man in remote mountains of Dhulwad Nashik News)

धुळवड चापडगाव शिवारात असलेल्या डोंगरामध्ये उंच कड्यावर टेलिंग कडा नावाचा भाग आहे हा भाग अतिशय दुर्गम असून तेथे केवळ जनावरे चारणारे गुराखी जात असतात बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास या भागात कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे काही गुराख्यांनी पाहिले त्यांनी धुळवडचे पोलीस पाटील तानाजी मंडले यांना माहिती दिली.

सदरचा परिसर सिन्नर आणि वावी पोलीस ठाण्याच्या सरहद्दीवर असल्याने श्री. मंडले यांनी दोन्ही पोलीस ठाण्यात मृतदेह आढळल्याची माहिती दिली.

सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक विजय सोनवणे हवालदार नितीन जगताप, पोलीस हवालदार गौरव सानप, निवृत्ती गीते, अंकुश दराडे यांनी धाव घेत अवघड चढण करून जात घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?c

Dead Body Found
Dharavi Crime: मुंबई हादरली! प्रियकराकडून प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सदरचा भाग सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सिन्नर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी केवळ कपडे घातलेला हाडांचा सापळा शिल्लक राहिल्याचे दिसून आले.

मृतदेह पूर्णपणे कुजून गेला असल्याने व मृताची ओळख पटवणारे कोणतेही पुरावे आढळून आल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले . मृताच्या अंगात निळा शर्ट, त्यावर जर्किंग, कान टोपी, नाईट पॅन्ट, कमरेला करगोटा, चप्पल असा पेहराव असल्याने सदर मृतदेह पुरुष जातीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला.

सिन्नर ग्रामिन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचरण करून जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. डीएनए चाचणी नमुने घेतले असून तपासणीनंतर मृताची ओळख पटवता येईल असे पोलीस निरीक्षक श्री. कुटे यांनी सांगितले.

दरम्यान, परिसरातून कोणी अनोळखी कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री कुटे यांनी केले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Dead Body Found
Crime news : IPLची मॅच बघितली; नंतर झाडली डोक्यात गोळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com