Nashik : डेंगी, चिकनगुनिया नोव्हेंबरमध्ये नियंत्रणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

डेंगी, चिकनगुनिया नोव्हेंबरमध्ये नियंत्रणात

नाशिक : ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात उद्रेक घडविणाऱ्या डेंगी व चिकूनगुनियाची साथ शहरात आटोक्यात येताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या दोन आठवड्यात डेंगीचे ६४ व चिकूनगुनियाचे ३३ रुग्ण आढळून आले असले तरी ऑक्टोबरच्या तुलनेत हेच प्रमाण निम्म्याहून कमी आहे.

कोरोना दुसरी लाट ओसरत असतानाच शहरात डेंगी व चिकूनगुनियाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली होती. मागील पाच वर्षातील आकडेवारीचा उच्चांक या दोन्ही आजारांनी मोडला. धूर व औषध फवारणीतील अनियमितता, तसेच डासांची उत्पत्ती साधनांचा नायनाट करण्यात अपयश आल्याचा हा परिणाम होता. ऑगस्ट महिन्यात डेंगीचे ३११, चिकूनगुनियाचे २०९ रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्यात डेंगीचे २५६, चिकूनगुनियाचे १६८ रुग्ण आढळले. ऑक्टोबर महिन्यात डेंगीचे १६२, चिकूनगुनियाचे ९२ रुग्ण आढळले होते.

त्यामुळे नोव्हेंबरमध्ये या रुग्णांची संख्या अधिक वाढते की काय, अशी भीती होती. परंतु, नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात डेंगीचे ६४, चिकूनगुनियाचे ३३ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, १ जानेवारी ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शहरात एक हजार ६८ डेंगीचे रुग्ण आढळले, तर चिकूनगुनियाचे ७३८ रुग्ण आढळले.

loading image
go to top