Nashik Crime News : द्राक्षेबागेचे नुकसान करणारे जोपूळचेच

Nashik Crime News : द्राक्षेबागेचे नुकसान करणारे जोपूळचेच
esakal

Nashik Crime News : जोपूळ (ता. दिंडोरी) शिवारात द्राक्षबाग तोडून शेतातील साहित्याची चोरी करुन नुकसान करणाऱ्या तिघा संशयितांना वणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

हे तिघे तरूण जोपूळ येथीलच असल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. (Destroyers of vineyards area are from jopul village nashik crime news)

जोपूळचे सरपंच व प्रगतशील शेतकरी माधव खंडेराव उगले यांच्या शेतातील द्राक्षबागांमध्ये दोन महिन्यांपासून काही अज्ञातांनी रात्रीवेळी द्राक्षांची झाडे कापून मोठया प्रमाणावर नुकसान करत होते. शेतात असलेले निवारा शेड देखील जाळले होते.

२० मेस देखील रात्री श्री. उगले यांच्या शेतातील ८० द्राक्षांची झाडे जमिनीपासून तोडण्यात आले, द्राक्ष बागेत पावडर मारण्यासाठी ठेवलेले ब्लोअर मशिनची ८ पितळी फुले आणि सूर्या कंपनीचा वजनकाटा असा एकूण बत्तीस हजाराचा मुद्देमालाची चोरी झाली. श्री. उगले यांनी वणी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्यादा दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime News : द्राक्षेबागेचे नुकसान करणारे जोपूळचेच
Nashik Crime News : बनावट क्रमांकाची लक्झरी बस RTOच्या ताब्यात

या घटनेमुळे जोपूळ गावातील शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार अशा घटना घडत असल्याने सरपंच व शेतकरींनी पोलिस अधीक्षक कार्यालयात येत प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली होती. यानंतर वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांचे पथक जोपूळ गाव व परिसरात रात्रंदिवस गस्त घालून पाळत ठेवून होते.

या घटनेतील अज्ञातांची गुन्हा करण्याची पध्दत व उपलब्ध पुराव्यांच्या विश्लेषणावरून मिळविलेल्या माहितीच्या आधारे वणी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोपूळ शिवारातून संशयित ऋषिकेश अंबादास वाघ (२०) रावसाहेब सूर्यभान आहिरे (२५), रोहित बाळू बनकर (२१, तिघेही रा. जोपूळ) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेत तपास सुरू आहे. पोलिस पथकाने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दहा हजाराचे बक्षीस दिले आहे.

Nashik Crime News : द्राक्षेबागेचे नुकसान करणारे जोपूळचेच
Nashik Crime News : कोळसा चोरी करताना एकाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com