Nashik News | उद्योगांसाठी पांजरापोळची जागा संपादित करा : फरांदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Devyani Farande

Nashik News | उद्योगांसाठी पांजरापोळची जागा संपादित करा : फरांदे

नाशिक : शहराचा औद्योगिक विकास होण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून चुंचाळे येथील पांजरपोळ संस्थेची जागा संपादित करण्याची मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. (Devyani Farande statement Edit panjarpol space for industries Nashik News)

अर्थसंकल्पावर आमदार फरांदे बोलत होत्या. नाशिक शहर झपाट्याने विकसित होत असून त्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित होत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. शहरातील वातावरण उद्योगासाठी पूरक असताना अनेक व्यवसायिकांकडून नाशिक येथे जागेची मागणी केली जाते.

परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांमध्ये वाढ करणे शक्य होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शहरातील बेकारीची समस्या गंभीर होत आहे. औद्योगिक वसाहतीला लागून चुंचाळे शिवारात पांजरपोळ संस्थेची 825 एकर जागा असून ही जागा संपादित केल्यास नाशिक येथे येऊ इच्छिणाऱ्या व्यवसायिकांना जमीन देणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले.

बाजारभावाप्रमाणे सदर जागा संपादित केल्यास पांजरपोळ संस्थेकडून गाईंचे पालन करण्यासाठी ग्रामीण भागात जमीन विकत घेतली जाऊ शकते व शहरातील औद्योगिकक्षेत्राची समस्यादेखील संपुष्टात येऊ शकते, असे मत आमदार फरांदे यांनी मांडले.

टॅग्स :Nashik