Nashik Crime News : डिझेल चोरट्यांना सायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले; मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : डिझेल चोरट्यांना सायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले; मुद्देमाल जप्त

चांदोरी (जि. नाशिक) : सायखेडा येथील सागर कुटे यांची हायवा (एमएच १२ एफसी ७७१५) घरासमोर लावलेली असताना मंगळवारी (ता. ३१) मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आवाज झाल्याने खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं असता दोन व्यक्ती या गाडीतून पळून गेले. सागर कुटे यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. (Diesel thieves chased and caught by Saykheda Police Confiscation of goods Nashik Crime News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी सहकाऱ्यांसमवेत रात्रीची गस्त घालत असताना संशयास्पद गाडीचा पाठलाग करून एक संशयिताला झडप घालून पकडले. तर एकजण पसार झाला. सायखेडा पोलिसांनी डिझेल चोरीसाठी वापलेल्या चारचाकी गाडी व साहित्यासह चार लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित सागर गरड (वय ३०, रा. पंचकृष्ण लॉन्सचे पाठीमागे, कोणार्क नगर) यास शिताफीने पकडले. त्याचा साथीदार फरारी झाला. पोलिसांनी ३०० लिटर डिझेल, होंडा सिटी कार (एमएच ०१ एनए ४८४१३) तसेच आठ ड्रम भरलेले डिझेल असे एकूण २४० लिटर डिझेल, अंदाजे ९० रुपये लिटर, डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्या असा एकूण चार लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

सागर कुटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कादरी, किरण ढेकळे, राजेंद्र घुगे, संदीप शेवाळे, तान्हाजी झुर्डे अधिक तपास करत आहे.