esakal | विकास दुबेचे थेट नाशिक कनेक्‍शन : विशेष गुप्त तपासणी पथक नाशिकमध्ये दाखल..सुत्रांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

vikas dubey 123.jpg

डीवायएसपीसह तब्बल आठ पोलिसांवर बेछूट गोळीबार करून हत्याकांड करणाऱ्या विकास दुबेचं युपीतील चौबेपुर ते नाशिक कनेक्‍शन आसल्याच तपासात उघड होत आहे. त्याने आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नाशिक पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यामध्ये कामगार पुरवण्या पासून तर वित्तीय संस्था.व कंपन्याना बंदुकधारी सुरक्षा रक्षक पुरवण्याचाही ठेकेदारी व्यवसाय थाटला आसून लिंक रोडवरील भंगार व्यवसायातही भागीदारी आसल्याच पोलिस सुत्राकडून सांगितले जात आहे.

विकास दुबेचे थेट नाशिक कनेक्‍शन : विशेष गुप्त तपासणी पथक नाशिकमध्ये दाखल..सुत्रांची माहिती

sakal_logo
By
सतिश निकुंभ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सातपूर : डीवायएसपीसह तब्बल आठ पोलिसांवर बेछूट गोळीबार करून हत्याकांड करणाऱ्या विकास दुबेचं युपीतील चौबेपुर ते नाशिक कनेक्‍शन आसल्याच तपासात उघड होत आहे. त्याने आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नाशिक पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यामध्ये कामगार पुरवण्या पासून तर वित्तीय संस्था.व कंपन्याना बंदुकधारी सुरक्षा रक्षक पुरवण्याचाही ठेकेदारी व्यवसाय थाटला आसून लिंक रोडवरील भंगार व्यवसायातही भागीदारी आसल्याच पोलिस सुत्राकडून सांगितले जात आहे या बाबत दोन दिवसापासून यु पी.च्या पोलिसा समवेत राज्यातील विशेष गुप्त तपासणी पथकही नाशिक मध्ये दाखल झाल्याचे पोलिस सुत्राकडून समजते. 

उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीमकडून नाशिक औरंगाबादमध्ये झडती​

दरम्यान उत्तर प्रदेश मधिल कुख्यात गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी तीन हजार पोलिसांच्या 50 टीम तैनात करण्यात आले आहे. कानपूरमधील बिक्रू खेड्यात विकास दुबे याच्या टोळीवर जो छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस दुबेचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशमधील DGP हितेश चंद्रा यांनी हाय अलर्ट घोषीत केला असून 75 जिल्ह्यासह इतर राज्यात सर्च ऑपरेशन आणि छापेमारी सुरू केली आहे. दुबेला पकडण्यासाठी तीन हजार पोलिसांच्या 50 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप दुबे पोलिसांना सापडला नाही. तसेच त्याचे इतर साथीदारही फरारच आहे. पोलिसांच्या निशाण्यावर असलेला दुबे व त्याची गॅग उत्तर प्रदेश राज्याच्या सीमा सील करण्यापूर्वी फरार झाल्याने विकास दुबे याच्या मोबाइलची शेवटच लोकेशन मध्यप्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील आहे. विकास दुबे इटवा आणि झांसीच्या मार्गाने मध्य प्रदेश अथवा सेधवा मार्गे महाराष्ट्रात दाखल झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. दुबे उत्तर प्रदेश व बिहार मधील निवडणूकी दरम्यान नाशिकमध्ये हमखास दाखल होत आसल्याची चर्चा अंबड लिंक रोडवर रंगली आसून मतदानासाठी हाक्काचे मानस हवे यासाठी त्याचे तिवारी व दुबे नावांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नाशिक

महाराष्ट्र पोलिसाची गुप्त तपास यंत्रणाही दोन दिवसापासून नाशिकमध्ये

पुणे, मुंबई ,औरंगाबाद, जालना, भिवंडी, ठाणे, पालघर सह रेल्वे जंक्‍शन स्टेशन आसलेल्या शहरात वित्तीय संस्था.कंपन्याना कामगार व बंदुक धारी सुरक्षा रक्षक पुरवण्या बरोबर भंगार व्यवसायातही भागीदारी केल्याची माहिती पोलिसाना मिळाली आहे. त्या अनुषंगाने युपीतील तपास पथका बरोबर महाराष्ट्र पोलिसाची गुप्त तपास यंत्रणाही दोन दिवसापासून नाशिक मध्ये दाखल झाल्याच बोलले जात आहे या तपासात आनेक कंपन्या मधिल ठेकेदारांची माहितीही मागवल्याच पोलिस सुत्राकडून समजते. 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

कोन आहे विकास दुबे ?- 
आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात 60 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यांमध्ये खून.दरोडा.भुमाफीया.अवैद्य व्यवसाय. ठेकेदारी.अवैद्य शस्त्र तयार करने व विक्री करने तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका खून प्रकरणात पोलीस विकास दुबेला अटक करायला गेले होते आणि त्यांचाच हात्याकांड दुबे ने घडवून आणला चा आरोप आहे.

हेही वाचा >  "आता मुख्यालयीच थांबा.. अन्यथा.." सरकारी बाबूंकडुनच नागरिकांना भीती 

loading image