Nashik Crime : कसबे सुकेणे येथे युवकांच्या दोन गटात वाद; 4 जण गंभीर जखमी, घटनेमुळे परिसरात कडकडीत बंद

Spontaneous strict shutdown observed by citizens at Kasbe Sukene Ta, Niphad
Spontaneous strict shutdown observed by citizens at Kasbe Sukene Ta, Niphadesakal

Nashik Crime : वार्ताहर ता१३ कसबे सुकेणे ता,निफाड येथील बसस्थानकावर शुक्रवारी रात्री१०.३० च्या सुमारास येथील युवकांच्या दोन गटात जोरदार हाणामाऱ्या झाल्या असून या वादात चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर ओझर आणि नाशिक येथील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान ओझर व कसबे सुकेणे पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिली.

कसबे सुकेणे येथील बसस्थानकावर हे वाद झाले असून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्या भांडणावरून हा वाद होऊन वादाचे पर्यावसान हाणामाऱ्यांमध्ये झाले. (Dispute between two groups of youths in Kasbe Sukene 4 people injured area strictly closed due to incident Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Spontaneous strict shutdown observed by citizens at Kasbe Sukene Ta, Niphad
Crime News : चोर तो चोर वर शिरजोर! कैऱ्या तोडू न दिल्याने तरूणावर वार

यात दोन्ही बाजूकडील युवक गंभीर जखमी झाले असून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहे. दरम्यान ओझर पोलीस घटनेचा संपूर्ण तपस करत असून जाब- जबान आणि पंचनामा तसेच गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असून गुन्हा दाखल झाल्या नंतर घटनेची संपूर्ण माहिती दिली जाईल, असेही पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी सांगितले.

या घटनेनंतर आज शनिवारी संपूर्ण कसबे सुकेणे शहर स्वयंमस्फुर्तीने बंद ठेवण्यात आला असून दिवसभर बसस्थानक, बाजार तळ , बाजारपेठ आणि संपूर्ण शहर बंद होते. कसबे सुकेणे गावात पोलिसांनी राखीव पोलीस दलाचे जवान ,ओझर, कसबे सुकेणे व पिंपळगाव बसवंत येथील पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्ताला ठेवण्यात आला असल्याचे ओझर पोलिसांनी सांगितले. संपूर्ण कसबे सुकेणे व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

"ओझर-कसबे सुकेणे पोलीस ठाणे- कसबे सुकेणे येथे युवकांचा दोन गटात वाद झाले असून यातील जखमींवर उपचार सुरु आहेत यातील काही जण बेशुद्ध असल्याने जाब जवाब घेता येत नाही घटनेचा तपास करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे, कसबे सुकेणे येथील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावा , या करीता कसबे सुकेणे येथे वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी."

- दुर्गेश तिवारी ,पोलीस निरीक्षक

Spontaneous strict shutdown observed by citizens at Kasbe Sukene Ta, Niphad
Crime News : चोर तो चोर वर शिरजोर! कैऱ्या तोडू न दिल्याने तरूणावर वार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com