Nashik News : टोल कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

Nashik News : टोल कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : पथकर भरण्यावरून शेतकरी व टोल कर्मचारी यांच्यात वाद झाले. टोलचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत वाहन रोखून धरले. त्यामुळे पिक-अपमधील दोन लाखांची कोथिंबिर सडली. शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.३) या विरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली. (dispute over payment of road tax manager employees of toll took stand stopped vehicle due to this farmers damage nashik news)

अंतरवेली (ता. निफाड) येथील विजय महाले यांनी कोथिंबिरीचे पीक काढून ते पिक-अपमधून नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी बुधवारी (ता.१) आणले होते. पिंपळगाव टोल प्लाझावर वाहन येताच पथकर आकारणीवरून वाहनचालक विरेन गांगुर्डे व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.

तेथे टोलचे व्यवस्थापक योगेश सिंग यांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान करून वाहन रोखन धरले. कोथिंबीर नाशंवत असल्याने ते फेकून देण्याची वेळ आली. सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे पिंपळगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम अधिक तपास करीत आहेत. निवेदनावर विजय महाले, प्रकाश महाले, विनायक महाले, संतोष महाले, शशिकांत महाले, बाळासाहेब महाले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.