Nashik News : जिल्ह्यात आजपासून सोमवारपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain News

Climate Update : जिल्ह्यात आजपासून सोमवारपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

नाशिक : जिल्ह्यात शनिवारपासून (ता. २८) सोमवारपर्यंत (ता. ३०) हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज इगतपुरीच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या ग्रामीण कृषी हवामान सेवाविभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. तसेच आकाश ढगाळ राहणार आहे.

त्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये हवामान कोरडे अथवा दमट राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमान ११ ते १६, तर कमाल तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला ९ ते १६ किलोमीटर राहण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. (District from today till Monday Light to moderate rain forecast minimum of 11 to 16 degrees Celsius is possible Nashik News)

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानाचा पूर्वानुमानासाठी ‘मेघदूत', तर विजेचा पूर्वानुमानासाठी ‘दामिनी’ या मोबाईल अॅप पचा वापर करावा.

हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता व स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेवर अथवा प्लास्टिक तथा ताडपत्रीने झाकून ठेवावे. फळबाग, पशूधन, कोंबड्यांचे थंड वाऱ्यापासून व पावसापासून संरक्षण करावे, असा सल्ला विभागाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikrain