तीर्थाटन आणि पर्यटनात सरमिसळ नको : डॉ. राजेंद्रसिंह

स्मार्टसिटी कामांचा आढावा
Do not mix in pilgrimage and tourism Dr Rajendrasingh nashik
Do not mix in pilgrimage and tourism Dr Rajendrasingh nashiksakal

नाशिक : स्मार्टसिटी उपक्रमात गोदावरी सौंदर्यीकरणाला महत्त्व दिले जाते आहे, मात्र ही कामे करताना तीर्थाटन आणि धार्मिक पर्यटनात सरमिसळ होऊ नये. प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीपात्रात न सोडता त्याचा इतर कारणांसाठी पुनर्वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले. महापालिकेतर्फे स्मार्टसिटी कार्यालयात बुधवारी (ता. ६) स्मार्टसिटी कामांचा व गोदावरी प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते.

महापालिका आयुक्त रमेश पवार, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, प्रा. प्राजक्ता बस्ते, अधिक्षक अभियंता शिवकुमार वंजारी, विनोद बोधनकर, राजेश पंडित, निशिकांत पगारे, देवांग जानी आदींसह पर्यावरणप्रेमी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की नाशिककर नागरिक गोदावरीला आई मानतात. इथल्या लोकांच्या डोळ्यात त्यांच्या गोदामाईविषयी आस्था आहे. मात्र, सध्या प्रदूषणाने जर्जर गोदावरी अतिदक्षता कक्षात आहे. जोपर्यंत सामान्य नाशिककरांच्या डोळ्यातून गोदामाई प्रती आस्था वाहत राहील, तोपर्यंत गोदावरी अविरत वाहत राहील. तिचे लेकरच तिला ठणठणीत बरे करू शकतात. किंबहुना गोदामाईचे लेकर म्हणून तिला ऊर्जितावस्थेत आणण्याची जबाबदारी नाशिककर नागरिकांचीच आहे. तत्पूर्वी श्री. वंजारी यांनी मलनिस्सारण केंद्राच्या कामकामाजी माहिती दिली. अनादी काळापासून नद्या वाहत असल्या तरी, नदीचे कार्यक्षेत्र ठरविणाऱ्या पूररेषेचा नियम २००८ पूर्वी नसल्याने सध्या पूररेषेतील बांधकामाचा विषय ऐरणीवर आला आहे. श्री. मोरे यांनी स्मार्ट सिटीच्या उपक्रमातील गोदावरी सौंदर्यीकरणावर सादरीकरण केले. प्रा. बस्ते, पंडित, पगारे, बोधनकर आदींनी विविध सूचना मांडल्या.

पर्यावरणप्रेमींच्या सूचना

  • गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे संवर्धन व्हावे.

  • स्मार्ट सिटीची निळ्या पूररेषेत भिंती कशाला?

  • सौंदर्यीकरणापेक्षा नदी शुद्धीकरण महत्त्वाचे

मी गिरणा का छोरा..!

आयुक्त श्री. पवार म्हणाले, की गिरणा आणि गोदावरी या जिल्ह्याच्या दोन प्रमुख नद्या आहेत. गिरणेच्या काठीच मी वाढलो असल्याने मी गिरणाचा छोरा आहे. नदीविषयी आस्थेशी मी अवगत आहे. त्यामुळेच पदभार स्वीकारल्यानंतर गोदावरीचे शुद्धीकरण हेच माझे पहिले प्राधान्य आहे. गोदावरीचे प्रदूषण कमी करून तिचे पावित्र्य वाढविण्याला माझे प्रशासन प्राधान्य देईन. पूररेषेतील मलवाहिन्या, सांडपाण्याचा पुनर्वापर, मलनिस्सारण केंद्राचे अद्यावतीकरण आणि रामघाटावरील १७ कुंडाचे पुनर्जीवन यावर लक्ष दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com