
Nashik Crime News : केवायसीच्या बहाण्याने डॉक्टरला गंडा
नाशिक : बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने शहरातील एका डॉक्टरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Doctor cheated on pretext of KYC Nashik Crime News)
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
याप्रकरणी डॉ. सृष्टी विक्रांत विजय (रा. कॉलेजरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे सासरे डॉ. विनोद विजन यांना अज्ञात भामट्याने गेल्या १ ते २ मार्च दरम्यान, बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्यासंदर्भात मोबाईलवर मेसेज पाठविला.
या मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडून संशयिताने डॉ. विजन यांच्या बँक खात्यावरून चार अनधिकृत व्यवहार करून तीन लाख ९९ हजार ९८४ रुपये इतर खात्यात वर्ग केले. हा आर्थिक व्यवहार करताना डॉ. विजन यांना कोणत्याही प्रकारचा ओटीपी आला नव्हता.
भामट्यांनी बँकेचे बनावट संकेतस्थळ तयार करून बँकेची ऑनलाइन ओळख चोरी केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.