माणुसकी दाखवणेही कठीण! कोरोना रुग्णांवर अल्पदरात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच धमकी

doctor
doctoresakal

नाशिक : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा (corona virus) प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णालयांमध्ये (hospitals) मोठ्या प्रमाणात रुग्ण (patients) भरती होवू लागले. मात्र नाशिकच्या या देवमाणसाने रुग्णालयात दाखल न होता घरी उपचाराने देखील कोरोनावर मात करता येवू शकते असा दावा करताना रुग्णांवर त्यापध्दतीने उपचार केले. पण आज त्यांनाच धमकी येऊ लागली आहे. काय घडले नेमके?

कोरोना रुग्णांवर अल्पदरात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच धमकी

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती होवू लागले. मात्र डॉ. अतुल वडगांवकर यांनी रुग्णालयात दाखल न होता घरी उपचाराने देखील कोरोनावर मात करता येवू शकते असा दावा करताना रुग्णांवर त्यापध्दतीने उपचार केले. त्यांच्या उपचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या दुसया लाटेतही अगदी कमी दरात रुग्णांवर उपचार होवून ते बरे होवू लागल्याने अद्यापही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. परंतू डॉ. वडगांवकरांना त्यांच्याच व्यवसायातील काही व्यापारी मानसिकतेच्या सहकाऱ्यांकडून धमकावण्याचा प्रकार घडल्याचा आरोप मनसेच्या वतीने करताना या प्रकाराचा निषेध करण्यात आला.

doctor
राजकीय पक्षाच्या नावाखाली कायदा हातात घ्याल; तर पडेल महागात - पो.आ.पांडे

मनसेकडून निषेध, संरक्षणाची मागणी

गेल्या वर्षभरापासून कोरोना बाधितांवर अल्पदरात उपचार करणारे डॉ. अतुल वडगांवकर यांना त्यांच्या व्यवसायातील काही व्यक्तींनी धमकी दिल्याचा आरोप मनसेच्या वतीने करताना मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पक्ष म्हणून मनसे डॉ. वडगांवकर यांच्या संपुर्ण ताकदीनिशी पाठीशी असल्याचा शब्द मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी त्यांची भेट घेवून दिला.कोरोना महामारीच्या काळात रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाया डॉ. वडगांवकर यांच्या पाठीशी मनसे संपुर्ण ताकदीनिशि उभी असल्याचे जाहीर करण्यात आले. शहराध्यक्ष अंकुश पवार, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, उपशहराध्यक्ष संतोष कोरडे, पराग भुसारी, समृद्ध रौंदळ, गणेश शेजूळ आदींनी डॉ. वडगांवकर यांची भेट घेतली.

doctor
कोरोनाकाळात भाग्य चमकले पण प्रामाणिकपणाने अडविले!

अल्पदरात कोरोना बाधितांवर उपचार करून दहा हजारांवर रुग्णांचे प्राण वाचविणारे डॉ. अतुल वडगांवकर देवदूत आहे. रुग्णसेवा करताना व्यापारी मानसिकतेच्या लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जसास तसे उत्तर देवू. कोरोना उपचारासंदर्भात अडचण असल्यास मनसे कार्यालयात संपर्क करावा.- अंकुश पवार, शहराध्यक्ष मनसे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com