Nashik News : कुणी तरी येणार, येणार गं...! धुमधडाक्यात रंगला गोरगरिब महिलांच्या डोहाळे जेवणाचा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dohale jevan ceremony for poor women in pimpalgaon baswant by Gram Panchayat nashik news

Nashik News : कुणी तरी येणार, येणार गं...! धुमधडाक्यात रंगला गोरगरिब महिलांच्या डोहाळे जेवणाचा सोहळा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : सजून धजून आलेल्या भावी माता, लवकरच मातृत्वाची ओढ संपणार असल्याचा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

या सुखाच्या क्षणात पिंपळगाव ग्रामपंचायतीतर्फे डोहाळे जेवणाचा (Dohale jevan) सोहळ्याचे आयोजन करून भावी माताच्या आनंदाला चार चॉद लावले. (Dohale jevan ceremony for poor women in pimpalgaon baswant by Gram Panchayat nashik news)

पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली बनकर यांच्या संकल्पनेतून पंधरा वर्षापूर्वी सुरू झालेला पण काही वर्षापासून बंद असलेल्या डोहाळे जेवणाचा सोहळा आज महिला दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा प्रांरंभ करण्यात आला. गरोदर मातांना पाळण्यात बसवून त्यांचे डोहाळे पुरवित उपस्थित महिलांना कुणी तरी येणार, येणार गं...या गितावंर आनंद व्यक्त केला.

श्रीमंताच्या घरी सुना, मुलीचे डोहाळे जेवण अगदी थाटामाटात होते. पण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कष्टकरी कुटंबातील गरोदर मातांना डोहाळे जेवण हे स्वप्नवत ठरते. हेच ओळखून सरपंच भास्करराव बनकर यांनी पिंपळगांव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गरोदर मातांचे डोहाळे जेवण व मुलीच्या जन्माचे स्वागत असा उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले.

सजावट केलेला पाळणा, फुलांनी सजावट केलेल्या गरोदर माता अशा उत्साहाच्या वातावरणात गोरगरिब महिलांचे डोहाळे जेवणात लाड पुरविण्यात आले. वैशाली बनकर यांनी साडी-चोळी, सुकामेवा ओटीत भरून हळदी कुंकु लावून महिलांचे डोहाळे जेवणाच्या उपक्रमाला प्रारंभ केला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

‘चांदण्यात न्या गं तिला, नटवा सजवा तिला, झोपाळे झुलवा, डोहाळे पुरवा, कोणी तरी येणार, येणार गं.. असे गीत गात उपस्थित ग्रामपंचायत महिला सदस्यांनी गोरगरिब महिलांचे लाड पुरविले. मैत्रिणीनी साजश्रृंगार करत त्यांचा हा क्षण खऱ्या अर्थाने स्पेशल बनवला. त्या माताही चेहऱ्यावरचा आनंद लपून राहिला नाही.

कोडकौतुकांत हरखून गेल्या. दोन-तीन महिन्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याचा स्वागतासाठी त्या महिलाही आतूर दिसल्या. मुलीच्या जन्माच्या स्वागताचा उपक्रमाचा शुभारंभ करताना मातेला बेबी किट देण्यात आले. मंडळ अधिकारी शीतल कुयटे, ग्रामपंचायत सदस्या छाया पाटील, रेखा लभडे, प्रतिभा बनकर, सपना बागूल, सोनाली जाधव, भारती मोरे आदी उपस्थित होत्या. सविता वैद्य यांनी सूत्रसंचलन केले.

"गोरगरिब महिला व बालकांचे संगोपन व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डोहाळे जेवणे व मुलीच्या जन्माच्या स्वागताचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. श्रीमंताप्रमाणे कष्टकरी कुटंबातील सुना, मुलीनांही हा आनंद मिळावा हा हेतू आहे." - भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत.

टॅग्स :NashikPregnant mothers