
Gas Price Reduction : घरगुती पाइप, गॅस व सीएनजीच्या किमतीत या जिल्ह्यांत कपात!
Gas Rate Reduction : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करत नव्या सूत्राला मान्यता दिल्याने घरगुती वापराच्या पाइप नॅचरल गॅस व कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किमती कमी होणार आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र नॅचरल गॅस या शहरी गॅस वितरण कंपनीने नाशिक व धुळे परिसरात किरकोळ विक्री किमतीत कपात केली. नवीन दराप्रमाणे पाइप गॅसची किंमत प्रती एससीएमला साडेपाच रुपयांनी कमी होईल. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किमती किलोला ६ रुपये कमी झाल्या. (Domestic pipe gas and CNG price reduction in dhule nashik district news)
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सुधारित पाइप नॅचरल गॅस (पीएनजी) ची किंमत प्रत्येक एससीएमला ४९ रुपये ५० पैसे अशी असेल. पूर्वी ही किंमत ५५ रुपये होती. सीएनजीची सुधारित किंमत किलोग्रॅमला ९० रुपये ५० पैसे अशी असेल. पूर्वीची किंमत ९६ रुपये ५० पैसे अशी होती. ही दरकपात ७ ते ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.
दरकपातीने एमएनजीएलचे सीएनजी आताच्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या तुलनेत सुमारे ४८ टक्के व २५ टक्के बचत होईल. त्यातील ४८ टक्के बचत ही प्रवासी वाहतुकीच्या वाहनांसाठी, तर २५ टक्के बचत ऑटोरिक्षांसाठी असेल.
एमएनजीएलची ही दरकपात घरगुती वापराच्या नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत कपात झाल्याने करण्यात आली आहे. दरकपातीनंतर घरगुती वापराच्या नैसर्गिक वायूच्या पीएनजीची किंमत एलपीजी सिलिंडरच्या किमतीच्या तुलनेत २० टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीतर्फे ही माहिती देण्यात आली.