Onion Farmers: कांदा उत्पादकांना पाचशे कोटींवर फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 onion farmers

Onion Farmers: कांदा उत्पादकांना पाचशे कोटींवर फटका

चांदवड - पोटच्या पोरावानी ज्या कांद्याला जीव लावला, वाढवले, त्याच कांद्याने आज शेतकऱ्यांना रडवल्याने कांदे अक्षरशः विक्री व न करता फेकून दिले तर काहींनी कांद्याची काढणीच केली नाही.

काही शेतकऱ्यांनी तर आपला संताप व्यक्त करत कांदा पिकावरच रोटर फिरवला आहे. कांदे विकून काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दराच्या घसरणीमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात जवळपास पाचशे कोटींचा फटका बसला आहे.

कांद्याला क्विंटलला सरासरी फक्त चारशे ते पाचशे रुपयेच भाव मिळत आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. कांद्याला बाराशे रुपये ते पंधराशे रुपये उत्पादन खर्च येतो.

आजच्या भावात शेतकऱ्यांना क्विंटलला आठशे ते नऊशे रुपये तोटा सहन करावा लागतो आहे. कांद्याची निव्वळ नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची,

मक्तेदारी मोडीत काढून राज्यातील इतर जिल्ह्यांसह देशभरातील बावीस विविध राज्यांतील शेतकरी कांद्याच्या लागवडीकडे वळल्याने कांद्याचे गणित बिघडले आहे.

नाशिक जिल्ह्यातील व्यापारी देशांतर्गत ज्या बाजारपेठांमध्ये आपला कांदा पाठवतात तिथे स्थानिक कांद्याचीही आवक आहे.

देशांतर्गत वाहतुकीचा खर्च क्विंटलला पाचशे ते सहाशे रुपये येतो तर स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांना तो एक ते दीडच रुपया येतो. शिवाय इतरही राज्यात कांद्याचे उत्पादन चांगले आले आहे.

केंद्र सरकारचे निर्यातीचेही धोरण निश्चित नाही. निर्यात धोरणात नेहमीच धरसोड असल्याने अन् निर्यातशुल्क अधिकचे असल्याचाही बाजारभावावर परिणाम होतो आहे.

कांदाप्रश्नी सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला तरच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी उभा राहील असे आजचे चित्र आहे.

कांद्याला दीड हजार हमीभाव द्या सटाणा शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली असून बळीराजा खचला आहे. मात्र बळीराजाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही, हे मोठे दुर्दैव आहे. शासनाने कांद्याचा समावेश जीवनावश्‍यक वस्तूमध्ये करून कांद्याला कमीतकमी १५०० रुपये हमीभाव मिळवून द्यावा,