...आणि भर पत्रकार परिषदेत अमित ठाकरेंनी काढले हुबेहुब चित्र!

amit thackray drawing
amit thackray drawingesakal

नाशिक : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) व दिवंगत श्रीकांत ठाकरे (shrikant tahackeray) ह्यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यंगचित्र नेहमीच चर्चेत असतात. त्याच व्यंगचित्र कलेचा ठाकरे परिवाराचा वारसा आज (ता.२८) राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे देखील जोपासताना दिसले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते राज ठाकरे यांच्यापर्यंत ही कला अंगी जोपसल्याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाला. ठाकरे परिवाराकडून बाळकडू मिळवलेला तिसऱ्या पिढीतील चित्रकारही आता पुढे आला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अमित ठाकरे यांनी एका पत्रकाराचे चित्र रेखाटले. आणि सुरू झाली चर्चा आणि कौतुकांचा वर्षाव! कारण आता ठाकरे परिवारातील तिसरी पिढीही ही कला जोपासत असल्याची अनुभुती नाशिकमध्ये आली. (drawing-picture-by-amit-thackeray-at-press-conference-jpd93)

कागद आणि पेन हाती घेत समोर बसलेल्या पत्रकाराचे हुबेहुब चित्र

आगामी निवडणुकींसाठी मनसे आता कामाला लागली आहे. यावेळी मनसेने आपलं लक्ष पुणेआणि नाशिक मध्ये केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. नाशिकची जबाबदारी अमित यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. संघटनात्मक आढावा घेण्यासाठी अमित यांचे बुधवारी सकाळी नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पत्रकारही उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे आणि संदिप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशपांडे पत्रकारांशी चर्चा करत असतांना अमित ठाकरे यांनी टेबलावरील कागद आणि पेन हाती घेत समोर बसलेले पत्रकार चंदन पुजारी यांचे चित्र रेखाटले. पत्रकार परिषद संपताच अमित यांनी पत्रकाराच्या हातात त्यांचे चित्र सोपवले. हे चित्र पाहून सर्वांनाच अमित यांच्या कलेचे कौतुक केले. गेल्या आठवडयात नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे फुटबॉल खेळत आपल्यातील क्रिडागुणांचेही दर्शन घडवले होते.

आपल्याला सर्वांनाच माहित आहे की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने त्यांची व्यंगचित्रे खूप गाजली. राज ठाकरे हे राजकीय नेता किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष होण्याआधीपासून एक व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि आता याच परिवारातील तिसरी पिढीही ही कला जोपासत असल्याची अनुभुती नाशिकमध्ये आली.

amit thackray drawing
नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : चोरीचा तपास लागला, 2 निलंबीत
amit thackray drawing
नाशिकच्या जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्रमुखांचा राजीनामा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com