पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशी वणवण!

water shortage
water shortageesakal
Summary

इगतपुरी तालुका म्हटला म्हणजे धरणांचा राजा आणि सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका. परंतु, या तालुक्याची पाणीटंचाई अजून काही कमी होण्याचे नाव घेत नाही.

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुका म्हटला म्हणजे धरणांची राजा आणि सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका. परंतु, या तालुक्याची पाणीटंचाई अजून काही कमी होण्याचे नाव घेत नाही. आवळखेड गाव अजूनही पाण्याच्या भटकंतीसाठी दोन-दोन किलोमीटर फिरत आहे. विशेष म्हणजे हे गाव इगतपुरीपासून अवघे सात किलोमीटर अंतरावर आहे. या गावाला ना रस्ता, ना पाणी अशी गत झाली आहे. (Drinking water shortage in Igatpuri )

गावाला कोणी दत्तक घेईल का?

१२०० लोकसंख्या असलेल्या या गावात सरपंच कृष्णा कैवारी व उपसरपंच संदीप पवार यांनी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना निवेदने देऊनदेखील समस्या सुटेना. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्‍न सरपंच व उपसरपंच यांनी विचारला आहे. जेवायला देऊ नका पण पाणी तर द्या, अशी भावनिक मागणी सरपंचांनी केली आहे. तालुक्यातील आवळखेड गाव हे इगतपुरी शहरापासून अगदी सात किलोमीटर अंतरावर आहे. येथे शासनाकडून एप्रिलपासून दोन टँकर सुरू आहेत. मात्र १२०० लोकसंख्या असलेल्या या गावाला टँकरने तरी काय होणार, असा प्रश्‍न आहे. गावात ज्या विहिरी आहे, त्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत. वयोवृद्ध, गरोदर महिलांना पाणी आणण्यासाठी मोठ्या जिकरीचे म्हणजे एक प्रकारचे आव्हानच समोर उभे राहते. दरम्यान, या गावाला जर तालुक्याच्या ठिकाणी यायचे असेल तर सात किलोमीटर येण्यासाठी एक तास लागतो, अशी येथील रस्त्यांची अवस्था झाली आहे. या गावाला कोणी दत्तक घेते का, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

water shortage
जनजागृतीमुळे मूलवडसह पस्तीस आदिवासी गावे कोरोनामुक्त

''कित्येक वर्षांपासून या आदिवासी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने अनेक निवेदने दिली असताना येथील प्रश्‍न मार्गी लागत नाही.''

- कृष्णा कैवारी, सरपंच.

''गावाला पिण्याच्या पाण्यासाठी तर भटकंती करावी लागत आहे. त्यातच इगतपुरी शहरापासून सात किलोमीटर अंतर असलेल्या या गावात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी एक तास लागतो. त्यामुळे तुम्हीच विचार करा, हा रस्ता कसा असेल.''

- संदीप पवार, उपसरपंच.

(Drinking water shortage in Igatpuri )

water shortage
यंदा इगतपुरीत ३२ हजार २३७ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com