शुक्रवार-जुम्माची सुट्टी बेतली 'सरताज'च्या जीवावर; दुर्दैवी घटना

शुक्रवार-जुम्माची सुटी असल्याने पाच तरुण गिरणा डॅमवर अंघोळीसाठी गेले
girna backwater
girna backwateresakal

मालेगाव (जि.नाशिक) : शुक्रवार-जुम्माची सुटी असल्याने नवी वस्ती भागातील पाच तरुण (youth) मळगाव शिवारातील गिरणा धरणाच्या (girna dam) पाण्यात अंघोळीसाठी गेले होते. पण हीच सुट्टी त्या तरुणांपैकी 'सरताज' वर बेतली आहे. काय घडले नेमके? (youth died girna backwater dam)

शुक्रवार-जुम्माची सुट्टी बेतली 'सरताज'च्या जीवावर

शुक्रवार-जुम्माची सुटी असल्याने नवी वस्ती भागातील पाच तरुण मतालुक्यातील येसगाव-मळगाव शिवारातील गिरणा डॅमच्या बॅकवॉटर अंघोळीसाठी गेले होते. यातील दोघे तरुण खोल पाण्यात सापडल्याने बुडू लागले. नजीकच्या ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एका तरुणाला वाचविले. दुर्दैवाने दुसरा तरुण सरताजला वाचविण्यात त्यांना अपयश आले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी (ता. ७) सकाळी हा प्रकार घडला. या दुर्घटनेत सरताज अहमद जान मोहंमद (वय १९, रा. नवी वस्ती, मालेगाव) याचा बुडून मृत्यू झाला.

girna backwater
नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती

पालकांनी आपापल्या पाल्यांवर लक्ष ठेवण्याची गरज

आगामी काळात रमजानच्या सुट्या लागणार आहेत. रमजानचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने सहेरीसाठी तरुण परिसरात फिरायला जातात. सुटीच्या दिवशी दुचाकीच्या रेस लावल्या जातात. त्यातून अनेक दुर्घटना व अपघात घडतात. नजीकचे तलाव, धरण, बंधाऱ्यात अंघोळीसाठी जाणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. पाण्यात बुडून अनेक तरुणांना प्राण गमवावे लागतात. या प्रकारांना आळा बसण्यासाठी पूर्व भागातील पालकांनी आपापल्या पाल्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

girna backwater
अचूक वीजबिल हवंय? कोरोना काळात महावितरणची विशेष सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com