Nashik Accident News : दुचाकी घसरून मद्यधुंद तरुणाचा मृत्यू

death
death esakal

Nashik Accident News : देवळाली- पाथर्डी रस्त्यावर हॉटेल रायबा चबूतऱ्याजवळ एका मद्यधुंद तरुणाचा दुचाकी घसरल्याने अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल सदानंद जाधव (३५, रा. सातपूर) यास दारूचे व्यसन होते. ()

शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घरच्यांना न सांगता ते आपल्या दुचाकीने (एमएच- १५ डीझेड- ८६१६) पाथर्डी फाट्याकडे जात असताना दारूच्या नशेत दुचाकीवरून घसरला.

त्यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

death
Accident News: ह्रदय हेलवणारी घटना! वडिलांचे पार्थिव गावाकडे घेवून जाताना मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे, हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोचले.

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

death
Nashik Crime News : बनावट क्रमांकाची लक्झरी बस RTOच्या ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com