Nashik : नोकर भरतीच्या हालचाली गतिमान; NMCचा आकृतीबंध

NMC News
NMC Newsesakal

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या नोकर भरतीची फाइल मंत्रालय स्तरावर हलण्यास सुरवात झाली आहे. महापालिकेने राज्य शासनाला सादर केलेल्या प्रस्तावातील त्रुटी संदर्भात कक्ष अधिकाऱ्यांकडून विचारणा झाल्याने, तसेच सेवा प्रवेश नियमावली संदर्भात महापालिकेकडून सादरीकरण करण्यात आले. (Dynamic recruitment activities Diagram of NMC Nashik Latest Marathi News)

शहराचे वाढती लोकसंख्या व महापालिकेचा वाढता व्याप लक्षात घेता महापालिकेने रिक्त पदासह सेवा प्रवेश नियमावलीचा आकृतिबंध शासनाला सादर केला आहे. २०१७ मध्ये शासनाला अहवाल सादर केल्यानंतर अद्यापही प्रलंबित आहे. महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्याने सुधारित आकृतिबंध मंजूर नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी शासनाने नवीन नोकर भरतीला निर्वाहकांतील अद्यापही दाखविलेला नाही.

शासन व महापालिका प्रशासन दोन्हीकडून तांत्रिक बाबी पूर्ण होत नसल्याने रिक्त पदांची भरती होत नाही व नवीन आकृतिबंधाला मंजुरी मिळत नाही. परिणामी सेवानिवृत्त होणारे कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून, सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याचा परिणाम म्हणून महापालिकेचे संपूर्ण कामकाज संथगतीने सुरू आहे.

NMC News
Bogus Medical Certificate Case : डॉ. सैंदाणे यांना 5 दिवसांची कोठडी

परंतु, आता प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून प्रस्तावाची छाननी सुरू करण्यात आली आहे. प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्याने आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांनी मंत्रालयात कक्ष अधिकाऱ्यांनी समोर आकृतिबंधाचे सादरीकरण केले.

"राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमावलीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. नगर विकास विभागाकडून छाननी सुरू झाल्याने त्या संदर्भात मंत्रालयात महापालिकेच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली." - मनोज घोडे-पाटील, प्रशासन उपायुक्त.

NMC News
Navratri 2022 : कालिकामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com