
Nashik News : शिक्षणाधिकाऱ्यांनी रोखले मुख्याध्यापकाचे वेतन
मालेगाव : टोकडे (ता. मालेगाव) येथील सत्यवती कौर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील धोंडू फरस यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंब) कायद्याचे उल्लंघन करून तिसरे अपत्य जन्माला घातले. (Education authorities withhold principals salary Nashik News)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
यासंदर्भात विठोबा द्यानद्यान यांनी पुराव्यासह २२ फेब्रुवारी २०२१ ला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास स्मरणपत्र दिले होते.
चौकशीअंती शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी ३ मार्च २०२१ पासून नियुक्ती प्राधिकारी संस्था असल्याने संस्थेस मुख्याध्यापक यांना बडतर्फ करण्याबाबत आदेश दिले. परंतु संस्थेने कोणतीच कारवाई केली नाही.
याबाबत कारवाई करिता शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून अनेक स्मरण आदेश देवून ही संस्थेने कारवाई केली नाही. शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांनी वेतन अधिक्षक यांना आदेश देत संबंधित मुख्याध्यापक यांचे फेब्रुवारी २०२३ पासूनचे वेतन व भत्ते थांबविण्याचे आदेश दिले आहेत.