Education Material Rates Hike: शालेय स्टेशनरी, वह्यांच्या किमतीत वाढ! पालकांच्या खिशाला बसणार झळ | Education Material Rates Hike School Stationery Book Prices Hike nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Educational Material

Education Material Rates Hike: शालेय स्टेशनरी, वह्यांच्या किमतीत वाढ! पालकांच्या खिशाला बसणार झळ

Education Material Rates Hike : पुढील महिन्यापासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. त्याच पाश्‍र्वभूमीवर गणवेश, शूज, दप्तर, बॅग, शालेय स्टेशनरी, वह्या, पुस्तके आदींच्या विक्रीसाठी बाजारपेठेतील दुकाने सज्ज झाली आहे.

मात्र यंदाच्या वर्षी शालेय स्टेशनरी, वह्या आदींची खरेदीसाठी पालकांच्या खिशाला नेहमीपेक्षा अधिकची झळ सोसावी लागणार आहे. यावर्षी शालेय स्टेशनरी व वह्यांच्या किमतीत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Education Material Rates Hike School Stationery Book Prices Hike nashik news)

१५ जूनपासून नवीन २०२३-२४ शैक्षणिक वर्षास सुरवात होत आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शालेय साहित्य खरेदीला उधाण येणार असून बाजारपेठेत गर्दी वाढणार आहे.

त्यासाठी बाजारपेठेतील दुकाने देखील आतापासूनच तयारीला लागले आहे. यावर्षी वह्यांच्या मुखपृष्टांमध्ये वह्यांची निर्मिती करणाऱ्या सर्व नामांकित कंपनीकडून विद्यार्थ्यांचा बदलता ट्रेड लक्षात घेता केजी टू पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मुखपृष्ठ तयार करून ती विक्रीसाठी बाजारात दाखल झाली आहे.

यात कलावंत, खेळाडू यांची जागा आता नैसर्गिक देखावे, उंचउंच इमारती, कार्टून, बांधकाम आदी छायाचित्रांनी व्यापली आहे. व यांचे मुखपृष्ठावर छायाचित्रे बदलले जातात. नामांकित कंपनीसोबत अनेक नवीन कंपन्या देखील त्यांच्या आकर्षक वह्या विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरामध्ये वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा मालाचे वाढलेले दर, कागदाच्या किमतीत झालेली वाढ, इंधनाच्या वाढलेल्या किमती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यंदा वह्यांच्या किमतीमध्ये सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वह्या खरेदी करताना पालकांना अतिरिक्त झळ सोसावी लागणार आहे.

वह्यांचे प्रकार व किंमत

हाफ साइज १०० पेजेस : ३० ते ३५ रुपये

२०० पेजेस : ४० ते ५० रुपये

लॉगबुक १०० पेजेस : ४० ते ६० रुपये

२०० पेजेस : ६० ते ७५ रुपये

ए फोर, १०० पेजेस : ४० ते ५० रुपये

१५० पेजेस : ७५ ते ८५ रुपये

२०० पेजेस : ८५ ते १०० रुपये

३०० पेजेस : १०० ते १५० रुपये

"यावर्षी वह्या, पाठ्यपुस्तक व शालेय साहित्य, चित्रकला साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. दरवाढीमुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पालकांना थोडासा दिलासा मिळावा योजनांच्या माध्यमातून सूटही काही व्यावसायिक देत आहे."

- स्वप्नील काबरा, संचालक, काबरा बुक डेपो मालेगाव

टॅग्स :Nashikeducationmaterials