esakal | दिंडोरीतील रिलायन्स प्रकल्पात कोरोना लसनिर्मितीसाठी प्रयत्न; नाशिक दौऱ्यात उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

subhash desai

रिलायन्सच्या प्रकल्पात कोरोना लसनिर्मितीसाठी प्रयत्न - देसाई

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : रिलायन्स उद्योग समूहातर्फे दिंडोरी येथे प्रस्तावित औषधनिर्मिती प्रकल्पात कोरोना लसीची निर्मिती व्हावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता. २१) येथे दिली. अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या उद्‌घाटनासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. (Efforts-to-produce-corona-vaccine-in-Reliance-proposed-project-marathi-news-jpd93)

रिलायन्सच्या प्रस्तावित प्रकल्पात कोरोना लसनिर्मितीसाठी प्रयत्न

रिलायन्स समूहाच्या प्रस्तावित औषध प्रकल्पासाठी दिंडोरीत १६० एकर जमीन देण्याची मागणी उद्योग विभागाने पूर्ण केली आहे. या प्रकल्पामुळे छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना मिळून हजारो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, बहुतांश राष्ट्रे चीनहून विविध उत्पादनांची आयात करतात. परंतु आता नाशिकमधून चीनला मशिनरी निर्यात होणार आहे. नाशिकमध्ये उद्योग क्षेत्रात वाढ होत आहे. देशात केवळ महाराष्ट्रातच शंभर टक्के उद्योग सुरू आहेत. ज्यामुळे लाखो कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. मुख्यमंत्रीदेखील यासाठी प्रयत्नशील असून, ते वेळोवेळी उद्योजक व कामगारांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना दिसतात. नाशिकच्या उद्योगांसंदर्भात आढावा घेण्यासाठी लवकरच स्वतंत्र वेळ काढून येईल, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले.

‘पांजरापोळ’साठी प्रस्ताव नाही

दरम्यान, पांजरापोळच्या जागेत सिडकोची नवीन योजना प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात विचारले असता, येथे नवीन एमायडीसी व्हावी, याबाबत आपल्याकडे अद्याप कोणतीही मागणी आलेली नाही. अशी मागणी येताच त्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल, असेही मंत्री देसाई यांनी या वेळी नमूद केले.

हेही वाचा: पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविणार; बावनकुळे यांचा इशारा

हेही वाचा: गोदेच्या पुरात स्मार्टसिटीची कामे टिकणार का? नागरिकांचा सवाल

loading image