
Nashik Bribe Crime : घोटीत वीजवितरणच्या अभियंत्यास लाच घेताना रंगेहात पकडले
Nashik Bribe Crime : घोटीतील विज वितरनच्या सहायक अभियंता सचिन चव्हाण यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानव्ये कारवाई करण्यात आली आहे. (Electricity Distribution Engineer Caught Red Handed Taking Bribe at ghoti Nashik Crime)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार विजेचा सद्यास्तिथीत असलेला लोढ वाढीव मंजुर करण्याच्या मोबदलयात ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान बुधवार ( ता. २६ ) रोजी मी. रा. वि. वि. कंपनीच्या कार्यालयात तक्रारदार यांच्या हस्ते पंच समक्ष श्री. चव्हाण यांनी स्वीकारण्यात आली आहे. सदरची कारवाई लाचलूचपत प्रतिबंध विभाग नाशिकच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सुज्ञ नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने लाचेची मागणी केल्यास नाशिक लाचलूचपत कार्यालयाशी संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.