Nashik Crime News : साडेअकरा तोळे सोन्याच्या दागिने चोरट्याने ओरबाडले | Eleven half tola gold jewelery stolen Nashik Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : साडेअकरा तोळे सोन्याच्या दागिने चोरट्याने ओरबाडले

Nashik Crime News : लासलगाव येथे सोमवारी (ता.२२) विवाहासाठी आलेल्या नाशिकच्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर चोरट्याने डल्ला मारला. हे लग्न जगतापांचे आहे का असे विचारत हूल देत दागिने ओरबाडून चोरट्याने पळ काढला.

गारवा लॉन्सच्या परिसराता ही घटना घडली. वृषाली सतीश हांडगे (रा. नाशिक) असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. लासलगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Eleven half tola gold jewelery stolen Nashik Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी सांगितले की सोमवारी (ता.२२) वृषाली हांडगे या नातेवाईकांच्या विवाहनिमित्त येथे आल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्या लहान मुलाला शौचास लागल्याने त्यांनी त्याला लग्नाच्या गर्दीपासून लॉन्स पार्किंगच्या परिसरात आणले.

त्यावेळी त्यांच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने हे लग्न जगताप कुटूंबियांचे आहे का असे विचारत हूल देत शिक्षिकेचे लक्ष विचलित केले आणि तेवढ्यात त्यांच्या अंगावरील साडेअकरा तोळ्याचे दागिने ओरबाडून घेत धूम ठोकली.

या दागिन्यांची किंमत तीन लाख छत्तीस हजार रूपये एवढी आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड तपास करत आहेत.