Nashik News: शोकाकुल वातावरणात मानोरीच्या जवानास साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप

Pooja Shelke, wife of late soldier Ajit Shelke, taking his last darshan
Pooja Shelke, wife of late soldier Ajit Shelke, taking his last darshanesakal

जळगाव नेऊर (जि. नाशिक) : मानोरी ता.येवला येथील सैन्यदलातील जवान अजित गोरख शेळके (वय २९) यांचा अपघातात मृत्यू झाल्याने सोमवार ता.२० रोजी सकाळी ९:३० वाजता मानोरी (खडकीमाळ) ता. येवला स्मशानभूमीत प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामात सलामी देत शोकाकुल वातावरणात लहान थोरांच्या जनसमुदायाने साश्रूनयनांनी अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. (emotional farewell to Manori indian army soldier Ajit shelke Nashik News)

मानोरी गावाबरोबर मुखेड गावातही व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.सैनिक अजित शेळके ५४ अरमाड बटालियन मध्ये राजस्थान श्रीगंगानगर येथे कार्यरत असताना मागील आठवड्यात ड्युटी करून घरी जाताना युनिट मध्ये झालेल्या अपघातात डोक्याला जबर मार लागला होता.

हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या उपचारा दरम्यान शनिवार ता.१८ रोजी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले होते. प्रशासकीय बाबी पुर्ण करून पार्थिव मानोरीकडे रवाना करण्यात आले.

सोमवार ता.२० रोजी सकाळी ७:३० ते ८:०० वाजेच्या दरम्यान पार्थिव दिवंगत सैनिकाच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. घरापासून ते खडकीमाळ स्मशानभूमीपर्यंत सजवलेल्या रथात पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले.

दिवंगत सैनिक अजित शेळके यांच्या पार्थिवावर विरपत्नी पुजा शेळके, वडील गोरख शेळके, आई ज्योती शेळके, कॅप्टन करणदिप सिंग, तहसीलदार प्रमोद हिले, येवला तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, जि.प.कृषी सभापती संजय बनकर, उद्योजक गोरख पवार,५४ अरमाडचे नायब सुभेदार डि. एस. बनसोडे, येवला तालुका सैनिक ग्रुपचे सुशिल शिंदे, भाऊसाहेब आदमाने, जळगाव नेऊर लक्ष्य डिफेन्स अकॅडमीचे संचालक निवृत्त सुभेदार आनंद गुंड, नाशिक जिल्हा सैनिक बोर्डचे अधिक्षक श्री. दाणे ,दत्ता डमाले, सरपंच नंदाराम शेळके, पो.हवा. पसाले, शरद लहरे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Pooja Shelke, wife of late soldier Ajit Shelke, taking his last darshan
Nashik Crime News: महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

सैन्यदलातील जवानांनी शस्त्रसंचलन करून मानवंदना दिली. अंत्यसंस्कार प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, शिवसेना नेते संभाजी पवार, माजी सभापती प्रकाश वाघ, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब गुंड, छगन आहेर, सहा. पो. नि. उज्वलसिंह राजपूत, श्री. भिसे, पोपट शेळके, नायब सुभेदार लिजेश ए, सेवानिवृत्त जवान भाऊसाहेब आदमाणे, रमेश तनपुरे, तलाठी पांडुरंग बोडके, पोलीसपाटील आप्पासाहेब शेळके, सदुभाऊ शेळके, बाबासाहेब तिपायले, लहानु शेळके, प्रकाश शिंदे, लक्ष्मण शिंदे, बबन शिंदे, जनता विद्यालयाचे प्राचार्य एम. ए. भगत, एस. एम. शेळके, एस. वाय. जाधव, आप्पासाहेब बडवर, शाम शिंदे आदी पंचक्रोशीतील नागरिक, महिला, ग्रामस्थ हजारोंच्या जनसमुदायाने उपस्थित होते. मुखेडच्या जनता विद्यालयातील गीतमंचातील विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत गायन केले.


प्रतिकूल परिस्थितीत अजित शेळके यांनी खडकीमाळ जि. प. प्राथमिक शाळेत शिक्षण पुर्ण केले तर जनता विद्यालय मुखेड शाळेत माध्यमिक शिक्षण पुर्ण केले होते. अजित शेळके हे २०१२ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाले होते.

अहमदनगर येथे पहिले प्रशिक्षण झाले. पंजाब येथून प्रथम देशसेवेस प्रारंभ करून काश्मीर, झाशी, दिल्ली आदी ठिकठिकाणी देशसेवा करत असताना तीन वर्षापूर्वी विरपत्नी पुजा शेळके यांचेसोबत विवाह झाला. अजित शेळके यांनी पत्नीसोबत सुखी संसाराचे बघीतलेले स्वप्न मात्र आलेल्या अकाली निधनाने अपुरे राहिले.

Pooja Shelke, wife of late soldier Ajit Shelke, taking his last darshan
Dhule News: दापुरा-दापुरी येथे वीजपंपांच्या वीजवाहिनी चोरीने शेतकरी त्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com